भारतात वापरलेल्या वाहनांच्या विक्रीला वेग: ड्रूम


मुंबई, ५ जून २०२२ : भारतीय ऑटोमोबाइल ई-कॉमर्स क्षेत्राचा पाया रचणारा मंच ड्रूम (Droom)ने २०१९ व २०२१ दरम्यान ४४ टक्के सीएजीआरची नोंद केल्याची घोषणा आज केली. पॅनडेमिकच्या काळामध्ये वापरलेल्या वाहनांच्या (यूज्ड वेईकल्सच्या) वापरामध्ये वाढ झाल्याने या मंचावरील व्यवहारांमध्ये २०२२ मध्ये ५८ टक्क्यांची मोठी वाढ दिसून आली.


आर्थिक वर्ष २१ मध्ये भारतीय ऑनलाइन वापरलेल्या वाहनांच्या बाजारपेठेचे मूल्य १५४ बिलियन रुपये इतके होते व आर्थिक वर्ष २६ पर्यंत हेच मूल्य ६६.९ टक्के सीएजीआर नोंदवित १,९९४ बिलियन रुपयांपर्यंत पोहोचेल असा अंदाज आहे. आर्थिक वर्ष २६ पर्यंत वापरलेल्या गाड्यांच्या बाजारपेठेचा ऑनलाइन विस्तार १० टक्क्यांच्या आसपास होईल, अशी अपेक्षा आहे. हे प्रमाण सध्या २ टक्के इतके आहे.


ग्राहकांकडून यूज्ड वेईकल्स ऑनलाइन विकत घेण्यास मिळू लागलेले प्राधान्य, प्रवासासाठी वाहतुकीची सामायिक साधने वापरण्याऐवजी खासगी वाहने वापरण्याकडे वाढणारा कल, प्रत्यक्ष डीलरशीपमध्ये असलेला वॉरंटीचा अभाव आणि वापरलेल्या गाड्यांमध्ये किंमतींचे अनेक पर्याय मिळण्याची असलेली सोय अशा सर्व गोष्टींमुळे हा अंदाज बांधण्यात आला आहे. इतकेच नव्हे तर कोव्हिड-१९ नंतरच्या काळामध्ये तयार झालेल्या आर्थिक अनिश्चिततेच्या परिस्थितीमुळेही वापरलेल्या गाड्यांना अधिक मागणी असल्याचे दिसून येत आहे.


वापरलेल्या वाहनांचे मार्केट हे ऑटोमोबाइल उद्योगक्षेत्रामधील काही सर्वोत्तम कामगिरी करणा-या श्रेणींपैकी एक असल्याचेही ड्रूमने आपल्या ताज्या अहवालात म्हटले आहे. तसेच भारताच्या अत्यंत वेगाने विकसित होत असलेल्या यूज्ड वेईकल्स बाजारपेठेच्या प्रगतीस चालना देणा-या काही प्रमुख कारणांमध्ये बीएस-४ वरून बीएस-६मध्ये झालेल्या परिवर्तनामुळे नवीन गाड्यांच्या वाढलेल्या किंमती, सेमीकंडक्टर चिपचा तुटवडा आणि इलेक्ट्रॉनिक गाड्यांसाठीच्या पायाभूत यंत्रणांविषयी स्पष्टता नसणे या कारणांचा समावेश आहे.


ड्रूमचे संस्थापक आणि सीईओ संदीप अग्रवाल म्हणाले, “वापरलेल्या वाहनांची बाजारपेठ सगळ्याच आघाड्यांवर सर्वोत्तम कामगिरी करत आहे आणि सध्याच्या काळामध्ये बाजारपेठेत भरपूर मागणी असलेल्या काही श्रेणींमध्ये तिचे नाव घेतले जात आहे. ड्रूम हा मंच नेहमीच वाढीच्या दिशेने वाटचाल करत आला आहे, तरीही ही बाजारपेठ ज्या अभूतपूर्व वेगाने भरभराटीस येत आहे ते पाहणे आश्चर्याचे आहे.


पॅनडेमिकची स्थिती ही वापरलेल्या वाहन उद्योगक्षेत्रासाठी एक छुपे वरदान ठरली आहे आणि या काळात ग्राहकांकडून नव्या गाड्यांऐवजी वापरलेल्या गाड्यांना अधिक प्राधान्य दिले जाऊ लागले आहे. येत्या महिन्यामध्ये ही वाढ अशीच सुरू राहील अशी आमची अपेक्षा आहे व अधिकाधिक ग्राहक या वेगाने विस्तारणा-या बाजारपेठेमधून जास्तीत-जास्त लाभ मिळवतील, अशी आशा आहे.”


ड्रूम या मंचावर अगदी सायकलींपासून ते विमानांपर्यंत, व्यावसायिक वाहनांपासून ते अर्थ मूव्हिंग वेईकल्सपर्यंत, इलेक्ट्रिकल वाहनांपासून ते इतर अनेक प्रकारच्या गाड्यांपर्यंत १५ पेक्षा अधिक ऑटोमोबाइल प्रकारांची विस्तृत श्रेणी उपलब्ध आहे. ड्रूमवर भारतभरातील ११५० हून अधिक शहरांतून येणा-या ३ लाखांहून अधिक ऑटोमोबाइल्सचा वेळेत पुरवठा केला जात आहे.

Post a Comment

0 Comments