एकनाथ खडसे यांच्या विजयासाठी कल्याण मध्ये साई बाबांना साकडे

राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी केली साईबाबा मंदिरात महाआरती

 

कल्याण : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते माजी मंत्री एकनाथ खडसे होऊ घातलेल्या संघर्षमय अश्या विधान परिषदेच्या निवडणुकीत विजयी होण्यासाठी कल्याण मध्ये राष्ट्रवादी व खानदेश बांधवांतर्फे कल्याण पश्चिम येथे साईबाबा मंदिरात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जिल्हा सचिव, नाथा भाऊ समर्थक प्रशांत माळी यांच्या नेतृत्वाखाली महाआरती करण्यात आली.


 याप्रसंगी खानदेश एलगारचे विजय चव्हाणखानदेश हीत संग्रामचे सुरेश पाटीलकल्याण माळी समाजाचे शरद महाजनखानदेशी हीत संग्रामचे कैलास पाटीलमाजी नगरसेवक उमेश बोरगावकर,  भुसावळचे युवक पदाधिकारी पृथ्वीराज पाटीलमाळी समाजाचे योगेश माळीअंकुश चांदुरकर व आकाश नाथ आदी पदाधिकारी कार्यकर्ता उपस्थित होते.


 याप्रसंगी संबोधित करत असताना प्रशांत माळी व विजय चव्हाण यांनी भाजपने कितीही घोडेबाजार केला तरी नाथाभाऊंचा विजय हा साई बाबांच्या कृपेने व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या आशीर्वादाने शंभर टक्के निश्चित आहे. २० तारखेला गुलाल आम्हीच उडवू असा विश्वास व्यक्त केला.

Post a Comment

0 Comments