रेज एक्स्पर्ट्स ३००० मेगावॅट क्षमतेचे सोलार प्रकल्प सुरु करणार


मुंबई, ८ जून २०२२ : रेज एक्स्पर्ट्स ही भारतातील अग्रगण्य सौर ऊर्जा प्लाण्ट कंपनी भारतातील शुद्ध ऊर्जा क्षेत्राप्रती लक्षणीय योगदान देण्यासाठी ३००० मेगावॅट व त्यापेक्षा अधिक क्षमतेचे सोलार प्रकल्प सुरू करण्याशी कटिबद्ध आहे. देशातील अव्वल सोलार ईपीसी कंपनी म्हणून रेज एक्स्पर्ट निवासी, व्यावसायिक, औद्योगिक, सोलार पार्क आणि उपयुक्तता-स्तरीय प्रकल्पांसाठी सर्वसमावेशक शुद्ध ऊर्जा उपाययोजना देते.


भारतातील अनेक सर्वात मोठ्या ग्रिड-कनेक्टेड पीव्ही ऊर्जा सुविधांचे नियोजन, वित्तपुरवठा, रचना, निर्माण आणि कार्यसंचालन रेज पॉवर एक्स्पर्टसकडून पाहिले जाते. विविध इन्स्टॉलेशन्सच्या माध्यमातून कंपनीला वार्षिक ६००,००० टन कार्बन डायऑक्साईडची बचत करण्यास यश मिळाले आहे, परिणामत: वार्षिक ८००,००० टन कोळशाची बचत झाली आहे.


भावी संभाव्य प्रकल्पांसह रेज एक्स्पर्ट्स वार्षिक २ मेट्रिक टन कार्बन डायऑक्साईडची बचत करण्यास अधिक साह्य करेल. विद्यमान प्रकल्पांमुळे ७० मेट्रिक टन कार्बन डायऑक्साईडची बचत झाली आहे, जे १०० मेट्रिक टन कोळशाएवढे आहे. या आकडेवारींचा पर्यावरण संवर्धनावर लक्षणीय दीर्घकालीन प्रभाव पडतो.


रेज पॉवर एक्स्पर्ट्स प्रा. लि.चे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता म्हणाले, "शुद्ध व नवीकरणीय ऊर्जेचा वापर पर्यावरणावर आपला नकारात्‍मक परिणाम कमी करण्याच्या दिशेने प्रमुख पावलांपैकी एक आहे. रेज एक्स्पर्टसमध्ये आमचा पर्यावरण संवर्धन अभियानामध्ये दृढ विश्वास आहे आणि आम्ही देशभरातील आमच्या विविध इन्स्टॉलेशन्सच्या माध्यमातून कार्बन डायऑक्साईडचे उत्‍सर्जन कार्यक्षमपणे कमी केले आहे.


आमचा आमच्या भावी प्रकल्पांमध्ये हीच बाब सुरू ठेवण्याचा मनसुबा आहे. सौर ऊर्जा उपाययोजना या अनेक पर्यावरणीय समस्‍यांसाठी उत्तर आहेत आणि म्हणूनच आम्ही आमचा व्यवसाय व त्याच्या विकासाप्रती कटिबद्ध आहोत. आम्हाला विश्वास आहे की, आमच्या विद्यमान व भावी प्रकल्पांमध्ये भावी हरित भविष्य घडवण्याची लक्षणीय क्षमता असेल."

Post a Comment

0 Comments