भिवंडीत कुटुंबिक वादातून दारुड्या पतीने जिवंत जाळून केली पत्नीची हत्या


भिवंडी दि 8(प्रतिनिधी )शहरातील चाविंद्रा परिसरात दारुड्या पतीने कुटुंबिक वादातून पत्नीस बेदम मारहाण करीत बेशुद्ध पडली असता जळणा साठी साठविलेल्या लाकूड फाट्यात टाकून जिवंत जाळल्याची घटना भिवंडी तालुका पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे .कविता चौरसिया वय 35 असे हत्या झालेल्या पत्नीचे नाव असून हत्या करणारा पती संतोष चौरसिया वय 35 यास भिवंडी तालुका पोलिसांनी अवघ्या काही तासात अटक करून बेड्या ठोकल्या आहेत.


मिळालेल्या माहिती नुसार त्याची बहीण कविता व तिचा पती संतोष हे दोघे त्यांच्या दोन मुलांसह चाविंद्रा येथील महाकाली ढाबा येथील चाळीत राहत होते .मोलमजुरी करणारा संतोष चौरसिया हा व्यसनाधीनतेच्या आहारी गेल्याने काही काम करीत नसल्याने त्याचे पत्नी कविता सोबत नेहमीच भांडण होत असे .मंगळवार 7 जून रोजी सुध्दा संतोष घरी दारू पिउन आला असता पत्नी कविता सोबत कोटुंबिक वादातून भांडण सुरू केले.


वाद विकोपाला गेल्याने संतोष ने पत्नीस लाकडी दांड्याने मारहाण करीत तिचे डोके लोखंडी कपाटावर आदळले.या मध्ये कविता बेशुद्ध पडली असता तिची हालचाल न जाणवल्याने पती संतोष ने घरा बाहेर पडवीत पावसाळ्यात जळणासाठी साठवून ठेवलेल्या लाकडाच्या ढिगाऱ्या जवळ तिला फरफटत आणून लाकडांसह बेशुद्ध पत्नीस जाळून तिची हत्या केली.


या बाबत भिवंडी तालुका पोलिसांनी माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय बोराटे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन कुलकर्णी यांच्या नेतृत्वाखाली पोलीस पथकाने अवघ्या काही तासात या हत्ये नंतर फरार झालेला पती संतोष चौरसिया याच्या मुसक्या आवळल्या आहेत.


या प्रकरणी मयत कविता चा भाऊ भारत रोज याने दिलेल्या फिर्यादी वरून पती संतोष चौरसिया या विरोधात हत्येसह पुरावा नष्ट करण्याच्या आरोपाखाली अटक करून न्यायालयात हजर केले असता आरोपीस पोलीस कोठडी ठोठावण्यात आली आहे .

Post a Comment

0 Comments