कल्याण : कल्याण डोंबिवली महानगरपालिका प्रभाग क्र. २४ मध्ये बिर्ला कॉलेज समोरील परिसरात शुटींग रेंज व बॉक्सिंगसाठी शेड उपलब्ध होणार असून अनेक दिवसांपासून या सुविधेपासून वंचित असलेल्या खेळाडूंना आता हक्काचे शुटींग रेंज व बॉक्सिंगसाठी शेड मिळणार आहे.
कल्याण : कल्याण डोंबिवली महानगरपालिका प्रभाग क्र. २४ मध्ये बिर्ला कॉलेज समोरील परिसरात शुटींग रेंज व बॉक्सिंगसाठी शेड उपलब्ध होणार असून अनेक दिवसांपासून या सुविधेपासून वंचित असलेल्या खेळाडूंना आता हक्काचे शुटींग रेंज व बॉक्सिंगसाठी शेड मिळणार आहे.
कल्याण मधील तरूणांमध्ये खेळांची आवड दिवसेंदिवस वाढतच आहे. परिणामी कल्याण मधील खेळाडू आपले व कल्याण शहराचे नावलौकिक मिळवू पाहत आहेत. याकरिता शिवसेनेच्यावतीने शर्तीचे प्रयत्न केले जात आहेत.
यास अनुसरूनच कल्याण पश्चिम मतदारसंघातील प्रभाग क्र. २४ मध्ये बिर्ला कॉलेज समोरील परिसरात शुटींग रेंज व बॉक्सिंगसाठी शेड उपलब्ध व्हावे याकरिता शिवसेनेच्या स्थानिक नगरसेविका निलीमा पाटील व विधानसभा सहसंघटक संजय पाटील यांच्या सततच्या पाठपुराव्याने आमदार विश्वनाथ भोईर शिवसेनेच्यावतीने शर्तीचे प्रयत्न केले जात आहेत.
आमदार विश्वनाथ भोईर यांनी आमदार निधीतून शुटींग रेंज 'बॉक्सिंगसाठी शेड व स्थापत्य या कामासाठी २५ लाख निधी उपलब्ध करून दिला असून या कामांचे भूमिपूजन शिवसेना आमदार विश्वनाथ भोईर यांच्याहस्ते करण्यात आले.
याप्रसंगी सदर भूमिपूजन करताना मला अत्यानंद होत असून कल्याणमध्ये अंतरराष्ट्रीय स्तरावरील जास्तीत खेळाडू निर्माण होतील असे मत व्यक्त करत त्यांनी बॉक्सिंग आणि शुटींग रेंजच्या साहित्यासाठी अजूनही निधी लागला तर मी देईन असे प्रतिपादन आमदार विश्वनाथ भोईर यांनी केले.
यावेळी 'अ' प्रभाग क्षेत्र संघटक विजय काटकर, उपशहर प्रमुख विद्याधर भोईर, उपशहर प्रमुख सुनील वायले, माजी नगरसेवक संजय पाटील, नगरसेविका नीलिमा पाटील, प्रियंका भोईर, शाखाप्रमुख गणेश कोते, रोहन कोट, तुकाराम टेमघरे, बाबू ढवळ व शिवसेना पदाधिकारी, शिवसैनिक, युवासैनिक, महिला आघाडी, मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 Comments