ई प्रभागातील मारुती दर्शन तीन मजली अतिधोकादायक इमारतीवर निष्कासनाची कारवाई


कल्याण : महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या निर्देशानुसार  ई प्रभागाचे सहा. आयुक्त भारत पवार यांनी डोंबिवली पूर्व मानपाडा रोड, स्टार कॉलनी येथील सुरेश मारुती पाटील यांच्या मालकीच्या तळ+३ मजली मारुती दर्शन या अतिधोकादायक इमारतीवर निष्कासनाची  धडक कारवाई आज सुरु केली. ही इमारत ३२ वर्ष जुनी असून सदर  इमारत रहिवास मुक्त करुन निष्कासनाची कारवाई सुरु करण्यात आली आहे.

हि कारवाई अतिक्रमण निर्मुलन विभागाचे कर्मचारी , महापालिका पोलिस कर्मचारी यांच्या मदतीने व १ हाईजो क्रशर मशिन ,१ कॉम्प्रेसर व १ जेसीबी च्या सहाय्याने करण्यात येत आहे.

Post a Comment

0 Comments