सुदृढ मन निरोगी शरीरा करिता योग विद्या महत्त्वपूर्ण - सतीश मुळवीकर (योग प्रशिक्षक)


कल्याण :  आंतरराष्ट्रीय योग दिनाचे औचित्य साधत कल्याण पूर्वेतील सम्राट अशोक विद्यालयात योग दिन साजरा करण्यात आला. पतंजली योग समितीचे प्रशिक्षक सतीश मुळवीकरपरमेश्वर जाधवमुकेशजीसुरेखा गायकवाड आणि एकता सिंग यांच्या बरोबर विद्यार्थ्यांनी योगासने केली.


योग प्रशिक्षक आणि मार्गदर्शक सतीश मुळवीकर  विद्यार्थ्यांशी संवाद साधताना म्हणाले, सातत्याने योगासने केली तर मन प्रसन्न आणि सुदृढ राहते. शरीर निरोगी राहते. भारतीय प्राचीन योग विद्या अनेक देशांनी स्वीकारलेले आहे. शरीराला तंदुरुस्त राहण्यास योग विद्या अत्यंत प्रभावी साधन आहे असे म्हणाले. विद्यार्थ्यांबरोबर मुख्याध्यापक गुलाबराव पाटील शाळेच्या शिक्षकांनी योग प्रशिक्षणात सहभाग घेतला.

Post a Comment

0 Comments