मुंबईत डोंबिवली वॉरीयर्सची बाजी

 


डोंबिवली ( शंकर जाधव ) डोंबिवली क्रिकेट अकादमीने आयोजीत केलेल्या डोंबिवली समर सिरीज 2022 क्रिकेटचे सामने मुंबईतील आझाद मैदान येथे खेळवण्यात आले. अंतिम सामना डोंबिवली बॉईज विरुद्ध डोंबिवली वॉरीयर्स यांच्यात पार पडला. या तीन सामन्यांच्या सीरीजमध्ये डोंबिवली वॉरीयर्स यांनी 2-1 अशी बाजी मारून सिरीज जींकली.


     पहिल्या आणि दुसऱ्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच विष्णू वर्मा, तर तिसऱ्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच आरांश गजघाट यांना घोषित करण्यात आले. यावेळी उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक आदित्य दुबे आणि पारस भोईर, तर उष्कृष्ट फलंदाज प्रितेश गोरे, इमरजींग प्लेअर (मुलगा) अर्णव करकरे, इमरजींग प्लेअर (मुलगी) सिद्धी नानावरे आणि मालीकावीर म्हणून विष्णू वर्मा यांना घोषित करण्यात आले.


      डोंबिवली समर सिरीज 2022 मालिकेसाठी दर्शन आडारकर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. तसेच टेन स्पोर्ट्सचे सुलतान खान, चॅम्प स्पोर्ट्सचे जिनेश शेलार, संजू सोईसचे रूपेश बाबीनकर, जागृती स्पोर्ट्सचे राहूल पाटील, विशाल पाटील, ड्रिम्स स्पोर्ट्सचे सुमेश धमाले, नितेश शेट्टी यांचे देखिल मोलाचे सहकार्य लाभले.

Post a Comment

0 Comments