पु ल कट्ट्यावर पु. ल. स्मृतिदिन साजरा

 


कल्याण : महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्व विनोदी साहित्यिक पु ल देशपांडे यांच्या २१ व्या  स्मृतिदिनी पु. ल. कट्टा कल्याण यांनी पु. ल. कट्टा नक्षत्र उद्यान कल्याण पश्चिम येथे पु. ल. देशपांडे यांना अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन केले होते.  यावेळी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या महाराष्ट्र राज्य कार्यकारिणी सदस्या सुरेखा भापकर आणि उत्तम जोगदंड हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.


यावेळी पु. ल. देशपांडे यांच्या प्रतिमेला भापकर यांच्याहस्ते पुष्पहार अर्पण करून पुष्पांजली अर्पण करण्यात आली. पुलंच्या आठवणींना उजाळा देण्यात आला. यावेळी भापकर यांनी पु ल हे कसे विज्ञानवादी विचारसरणीचे होते हे पु ल ची विज्ञानाची प्रशंसा करणारे किंवा विज्ञानवादी दृष्टिकोन दर्शविणाऱ्या वाक्यांचा दाखला देऊन सांगितले.


यावेळी राजेश देवरुखकर यांनी पु ल देशपांडे यांच्या खोगीरभरती या पुस्तकातील गायनी गळा  या लेखातील उताऱ्याचे अभिवाचन करून उपस्थितांची मने जिंकली आणि पुलंच्या प्रतिभेला उपस्थितांनी अभिवादन केले. या कार्यक्रमास प्रशांत म्हात्रेसंतोष पंडित, दत्ता केम्बुळकर, अमोल चौघुलेनिशिकांत विचारे व इतर मान्यवर उपस्थित होते.


Post a Comment

0 Comments