कल्याण : कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रातील प्रभाग क्रमांक ४३ जय मल्हार नगर,पिसवली गाव, अडिवली-ढोकली येथे नगरसेवक कुणाल पाटील यांच्या विशेष प्रयत्नाने व महाराष्ट्र शासनाच्या दलित वस्ती निधीतून साकारण्यात आलेल्या शौचालय व स्नानगृहाचा लोकार्पण सोहळा नगरसेवक कुणाल पाटील यांच्या हस्ते पार पडला.
त्याचप्रमाणे नेताजी नगर येथील रस्त्याची अवस्था अत्यंत बिकट झाली होती. नागरिकांना पावसाळ्यात प्रचंड हाल सोसावे लागत होते. या समस्येचे निराकारण करण्यासाठी कुणाल पाटील यांनी विशेष निधीची तरतूद करून या रस्त्याचे काँक्रेट करण्याचे काम सुरु करण्यात आले आहे.तसेच जय मल्हार नगर येथील अंतर्गत रस्त्याचे काँक्रेटिकरण करण्यासाठी १० लाखाचा निधी मंजूर करण्यात आला असून, या रस्त्याच्या कामाला देखील सुरवात करण्यात आली
याप्रसंगी समाजसेवक अनिल पाटील, कैलास भोईर (मा. सरपंच-पिसवली), नकुल भोईर, अशोक म्हात्रे, गोविंद भोईर, राजन दुबे (राष्ट्रवादी युवा पदाधिकारी), गणेश भोईर, मनीष पाटील (समाजसेवक-पिसवली), धिरज राजाभोज, धीरज पाटील, विजय राठोड, अरुण गुप्ता, सुरेंद्र राठोड, संतोष जाधव, संतोष सुतार, रवि पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 Comments