विद्यार्थी मार्गदर्शन मेळाव्याला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद


कल्याण : शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्त  शिवसेना कल्याण शहर तर्फे आयोजित विद्यार्थी मार्गदर्शन मेळाव्याला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. विद्यार्थांचे मनोबल व जिद्द वाढावी यासाठी विद्यार्थी मार्गदर्शन मेळावा शनिवारी कल्याण पश्चिमेतील आचार्य अत्रे रंगमंदिर येथे आयोजित करण्यात आला होता.


यावेळी साहित्यिक कवी प्राध्यापक प्रवीण दवणे आणि मुंबई विद्यापीठाचे उप कुलगुरू अशोक प्रधान यांच्याहस्ते दीपप्रज्वलन व छत्रपती शिवरायांचे पुजन होऊन कार्यक्रमाची सुरूवात झाली. डॉ जितेंद्र भामरे यांना मुंबई विद्यापीठ तर्फे पीएच.डी. मिळाल्याबद्दल त्यांचा सत्कार अशोक प्रधान यांच्या हस्ते शालश्रीफलपुष्पगुच्छ व स्मृतीचिन्ह देऊन करण्यात आला.


त्यानंतर प्रवीण दवणे यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. एकुण अठराशे  विद्यार्थ्यांनी या मार्गदर्शनाचा लाभ घेतला. यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन पुस्तिका देखील देण्यात आली असल्याची माहिती शिवसेना महानगर प्रमुख विजय साळवी यांनी दिली.

Post a Comment

0 Comments