विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन सेमिनार रिलायबल अकॅडमीची परभणी पासून मुंबई पर्यंत भरारी" द आयएएस हब" आता मुंबई, दादर मध्ये देखील


कल्याण : रिलायबल अकॅडमी दादर मुंबई  व "द आयएएस हब" दिल्ली  यांचा वतीने शुक्रवारी आयोजित केलेले एक दिवसाचे "स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन सेमिनार" मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या विद्यार्थ्यांच्या समवेत उत्साहात संपन्न झाले.

मुंबई महानगराच्या परिसरात अनेक विद्यार्थ्यांकडे गुणवत्ता असून सुद्धा योग्य नियोजन आणि गुणवत्तापूर्ण स्पर्धा परीक्षेचे ज्ञान मिळत नाही. याच बाबीचा विचार करून  रिलायबल अकॅडमीचे संस्थापक  मनोहर पाटील यांनी स्पर्धा परिक्षेत्रातील विद्यार्थ्यांना  गुणवत्ता पूर्ण सखोल माहिती देण्यासाठी व यूपीएससी मधील नागरी सेवांचा स्पर्धा परीक्षा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी दिल्लीस्थित "द आयएएस हब" या नामांकित स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रांच्या संयुक्त विद्यामाने दादर येथील छबिलदास शाळेच्या सभागृहात  एक दिवसीय स्पर्धापरीक्षा सेमिनारचे आयोजन करण्यात आले होते.या सेमिनारद्वारे युपीएससी नागरी सेवा परीक्षेची रणनीतीअभ्यास कसा करावा त्याच बरोबर अभ्यासाचे योग्य नियोजन त्याबद्दल सखोल माहिती देण्याकरिता दिल्लीचे नामांकित ऑफिसर्स माजी केंद्रीय दक्षता अधिकारी एम के यादव, आयएएस अधिकारी रितिका जिंदाल  आणि आयपीएस अधिकारी ईशान टिपणीस यांनी विद्यार्थ्यांना महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केले. यापुढेही द आयएएस हब टीम आणि आम्ही सर्व ऑफिसर्स  विद्यार्थ्यांना नियमित मार्गदर्शन करणार आहोत असा विश्वास विद्यार्थ्यांना दिला. हे सेमिनार विद्यार्थ्यांच्या भवितव्याला नक्कीच एक वेगळी दिशा देणारा ठरणार आहे. तरी या एक दिवसीय सेमिनार साठी  मुंबई महानगर आणि परिसरातील विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने हजर राहून या संधीचा लाभ घेतला.

Post a Comment

0 Comments