आपली रिटेल उपस्थिती अपवादात्मकरित्या वाढवणा-या शुगर कॉस्‍मेटिक्‍सने १००व्‍या ब्रॅण्‍ड मालकीच्‍या स्‍टोअरसह संपादित केली नवीन उपलब्‍धी

शुगर कॉस्‍मेटिक्‍स साडेतीन वर्षांपेक्षा कमी विक्रमी वेळेमध्‍ये १००व्‍या ब्रॅण्‍ड आऊटलेटपर्यंत पोहोचले


मुंबई,०९ जून, २०२२:  शुगर कॉस्‍मेटिक्‍स या भारतातील सर्वात मोठ्या ओम्‍नीचॅनेल ब्‍युटी कंपनी आणि जनरेशन झेड व मिलेनियल ग्राहकांमधील लोकप्रिय कंपनीने आज व्‍हीआर चेन्‍नई अण्‍णा नगर येथे त्‍यांच्‍या १००व्‍या ब्रॅण्‍ड मालकीच्‍या स्‍टोअरचे उद्घाटन केले.


वितरण वाढवण्‍याच्‍या ब्रॅण्‍डच्‍या मुलभूतध्येयाला अधिक दृढ करत शुगर कॉस्‍मेटिक्‍सने २०१९ च्‍या सुरूवातीला त्‍यांच्‍या पहिल्‍या स्‍टोअरनंतर ब्रिक-अॅण्‍ड-मोर्टार स्‍टोअर्समध्‍ये गुंतवणूक करणे सुरूच ठेवले आणि आता साडेतीन वर्षांच्‍या आत त्‍यांचे १००वे स्‍टोअर संपादित केले आहे. ब्रॅण्‍डने मागील वर्षामध्‍ये ५० टक्‍क्‍यांहून अधिक अद्भुत रिटेल स्‍टोअर वाढ नोंदवली आहे आणि त्‍यांची एकूण उत्पादन श्रेणी जवळपास ५५० हून अधिक एसकेयूंपर्यंत वाढवली आहे.


शुगर कॉस्‍मेटिक्‍सने २०१५ मध्‍ये डी२सी ब्रॅण्‍ड म्‍हणून सुरूवात केली आणि त्‍वरित २०१७ मध्‍ये ऑफलाइन ट्रेडमध्‍ये प्रवेश केला. ब्रॅण्‍ड २०२० मधील २५०० हून अधिक रिटेल आऊटलेट्सवरून आज ५०० हून अधिक शहरांमधील ३५,००० रिटेल टचपॉइण्‍ट्सपर्यंत पोहोचला.


महामारी सुरू झाल्‍यापासून अनेक ब्रॅण्‍ड्सनी स्‍टोअर्स सुरू करण्‍याचे टाळण्‍यासोबत विद्यामन स्‍टोअर्स बंद करत असताना शुगर कॉस्‍मेटिक्‍सने त्‍यांच्‍या रिटेल ग्राहकांचे आरोग्‍य व सुरक्षिततेला अधिक प्राधान्‍य देत मार्च २०२० पासून ६० हून अधिक स्‍टोअर्स लॉन्च केले. या नवीन लॉन्चमध्‍ये शुगरने चेन्‍नई, बेंगळुरू, हैदराबाद, दिल्‍ली, मुंबई, जालंधर, नागपूर येथील १५ हून अधिक स्‍टोअर्ससह प्रमुख मेट्रो शहरांमध्‍ये प्रवेश केला.


स्‍टोअरच्‍या उद्घाटनाबाबत बोलताना शुगर कॉस्‍मेटिक्‍सच्‍या सह-संस्‍थापक व मुख्‍य कार्यकारी अधिकारी विनीता सिंग म्‍हणाल्‍या,''आम्‍हाला विक्रमी वेळेमध्‍ये शुगर कॉस्‍मेटिक्‍सच्‍या स्‍टोअर्सची संख्‍या शतकापर्यंत घेऊन जाणा-या टीमचा अत्‍यंत अभिमान वाटतो. तसेच आम्‍हाला चेन्‍नईमध्‍ये हे १००वे ब्रॅण्‍ड मालकीचे स्‍टोअर सुरू करण्‍याचा आनंद होत आहे.


शुगर कॉस्‍मेटिक्‍समध्‍ये आम्‍ही वितरण, उत्‍पादन, कन्‍टेन्‍ट व समुदाय या आमच्‍या मुलभूत आधारस्‍तंभांवर लक्ष केंद्रित करण्‍याची खात्री घेतली आहे. महामारीदरम्‍यान देखील आम्‍ही आमची व्‍याप्‍ती वाढवण्‍याचे कार्य सुरू ठेवले आहे आणि इतर ब्रॅण्‍ड्स त्‍यांचे विद्यमान रिटेल बंद करत असताना आमचा ऑफलाइन विस्‍तार केला आहे.


आमच्‍या पहिल्‍या स्‍टोअरच्‍या लॉन्चपासून आम्‍ही आतापर्यंत अल्‍पावधीतच लांबचा पल्‍ला गाठला आहे. अधिकाधिक ग्राहक ब्रिक-अॅण्‍ड-मोर्टार आउटलेटमध्ये खरेदी करण्‍याला प्राधान्‍य देण्‍यासोबत आमच्‍या रिटेल स्‍टोअर्सचा महसूल जवळपास ६५टक्‍क्‍यांपर्यंत पोहोचण्‍यासह आम्हाला आशा आहे की, हे लॉन्च त्‍यांच्‍याप्रती आमच्‍या कटिबद्धतेला सादर करेल.''


शुगर कॉस्‍मेटिक्‍सचे देशभरात ३५,००० हून अधिक आऊटलेट्स आहेत, जेथे दक्षिण बाजारपेठ ब्रॅण्‍डसाठी महत्त्वपूर्ण आहे. भारतभरातील चारही विभागांपैकी दक्षिण विभाग आमचे रिटेल टच-पॉइण्‍ट्स असलेला दुसरा सर्वाधिक मोठा विभाग आहे.


खरेदीच्‍या संदर्भात पुढील १० वर्षांमध्‍ये ऑफलाइन रिटेल वर्चस्‍व राखेल हे माहित असल्‍यामुळे ब्रॅण्‍डची पुढील १२ ते १५ महिन्‍यांमध्‍ये ऑफलाइन उपस्थिती ६०,००० स्‍टोअर्सपर्यंत वाढवण्‍याची योजना आहे. शुगर रिटेल मार्केटिंग वाढवत आणि मर्चंडाइजिंग अनुभव देत आपली उत्‍पादन श्रेणी व वितरणासह अधिक भर देत आपली रिटेल उपस्थिती दृढ करेल.

Post a Comment

0 Comments