महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीची राज्य कार्यकारीणी जाहीर

अध्यक्षपदी अविनाश पाटील  तर राज्य कार्याध्यक्षपदी माधव बावगे यांची एकमताने निवड


कल्याण : शहीद डॉ. नरेंद्र दाभोलकर स्थापित महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समितीच्या  राज्य अध्यक्षपदी अविनाश पाटील (धुळे) तर राज्य कार्याध्यक्षपदी माधव बावगे (लातूर) यांची एकमताने निवड करण्यात आली.


 महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समिती ची विस्तारित राज्य कार्यकारिणी बैठक दि. ३५ जून  रोजी औरंगाबाद येथील महात्मा गांधी मिशन विद्यापीठ येथे नुकतीच संपन्न झाली.


  या राज्यस्तरीय बैठकीस ३२ जिल्ह्यातून १७२ राज्य व जिल्हास्तरीय प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. या बैठकीत  सन २०२२- २०२५ या तीन वर्षासाठी ची नूतन राज्य कार्यकारिणीची एकमताने निवड करण्यात आली.

Post a Comment

0 Comments