ड्युरोफ्लेक्सने आणली मॅट्रेसेसची अभिजात ‘एनर्जाइझ’ श्रेणी सुयोग्य नवीन अवतारात

नव्या रूपातील एनर्जाइझ आजच्या उच्च कामगिरीच्या जीवनशैलीच्या मागण्या पूर्ण करते, नव्याने ऊर्जा  देणाऱ्या उत्तम रात्रीच्या झोपेची हमी देते


राष्ट्रीय, जून, २०२२: नवोन्मेष व वैविध्य ही वैशिष्ट्ये असलेल्या ड्युरोफ्लेक्स या भारतातील आघाडीच्या स्लीप सोल्युशन ब्रॅण्डने एनर्जाइझ ही आपली अभिजात श्रेणी ब्रॅण्ड न्यू अवतारावर पुन्हा एकदा लाँच केली आहे. नवीन प्रगत सुविधांसह सुधारित स्वरूपात आलेली ही अद्ययावत श्रेणी आजच्या वेगवान व उच्च कामगिरीने भरलेल्या ग्राहक जीनवशैलीच्या मागण्या पूर्ण करण्याच्या दृष्टीने तयार करण्यात आली आहे.


अनन्यसाधारण कॉपर जेल इन्फ्युजन स्तर आणि ताणरोधक कापड यांच्या माध्यमातून एनर्जाइझ तंत्रज्ञानाच्या दृष्टीने अधिक चांगली करण्यात आली आहे. मोठ्या तणावाचा सामना करणाऱ्या तरुण ग्राहकांना अगदी गाढ व नव्याने ऊर्जा देणारी झोप लागावी आणि त्यांनी ताजीतवानी भावना घेऊन दिवसाच्या आव्हानांना सज्ज होऊन उठावे या दृष्टीने ही श्रेणी विकसित करण्यात आली आहे.


या श्रेणीच्या माध्यमातून ब्रॅण्डने शाश्वततेच्या दिशेनेही एक पाऊल पुढे टाकले आहे. या मॅट्रेसेसमध्ये वापरण्यात आलेले तणावरोधक वस्त्र तयार करण्यासाठी वापरलेल्या पीईटी बाटल्यांपासून तयार करण्यात आलेले रिसायकल्ड सूत ४० टक्के वापरण्यात आले आहे.


ड्युरोफ्लेक्सच्या मुख्य मार्केटिंग अधिकारी स्मिता मुरारका यावेळी म्हणाल्या, “दर्जेदार झोपेचा अर्थ नव्याने प्रस्थापित करण्याचा प्रयत्न ड्युरोफ्लेक्सच्या माध्यमातून आम्ही सातत्याने करत आहोत. आधुनिक ग्राहकांच्या बदलत्या गरजा व मागण्या यांच्याशी जुळवून घेण्यासाठी नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून आमच्या उत्पादनांचा नव्याने विकास करण्यावर आमचा गाढा विश्वास आहे.


 नव्याने आणलेली एनर्जाइझ श्रेणी आजच्या तरुण व्यक्तींच्या घडामोडींनी भरलेल्या जीवनशैलीसाठी अत्यंत अनुकूल आहे. या उच्च कामगिरी करणाऱ्या गाद्या आहेत. त्यावर गाढ, विश्रांती देणारी झोप लागते आणि त्यामुळे मन व शरीराला अत्यंत आवश्यक असलेला आराम मिळतो, जेणेकरून सकाळी उठून पुढील दिवस नव्या ऊर्जेने सुरू करता येईल.”


गुबगुबीत मॅट्रेसेसची एनर्जाइझ श्रेणी देशभरातील सर्व आघाडीच्या ड्युरोफ्लेक्स रिटेल दुकानांमध्ये उपलब्ध असतील आणि ब्रॅण्डच्या वेबसाइटवरून www.duroflexworld.com ऑनलाइन खरेदीही करता येईल. ही उत्पादने अमेझॉन व फ्लिपकार्ट यांसारख्या आघाडीच्या ई-कॉमर्स पोर्टल्सवरही उपलब्ध आहेत. त्यांची किंमत १४,५०० रुपयांपासून सुरू होते.

Post a Comment

0 Comments