नेक्स्ट एज्युकेशन भारतातील आघाडीचे के-१२ शिक्षण सोल्यूशन्स प्रदाता बनलेमुंबई, १६ जून २०२२: तंत्रज्ञान-आधारित सोल्यूशन्सच्या माध्यमातून शिक्षण क्षेत्रात क्रांतिकारी बदल घडवून आणण्याच्या दृष्टीकोनासह श्री. बीस देव राल्‍हन आणि श्री. रविंद्रनाथ कामत यांनी २००७ मध्ये नेक्स्ट एज्युकेशनची स्‍थापना केली. कंपनीचे भारतातील इतर एडटेक सोल्यूशन प्रदात्यांच्या तुलनेत सध्याच्या स्थितीत एक स्‍तर वर राहण्यासाठी सर्वसमावेशक सोल्यूशन्स आहेत. कंपनीचा १८०० हून अधिक कर्मचा-यांचा इन-बिल्ट टॅलेण्ट समूह आहे आणि १८,००० हून अधिक शाळांमधील १२,०००,००० हून अधिक विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गरजांची पूर्तता करते. नेक्स्ट एज्युकेशन भारतातील आघाडीचे के-१२ शिक्षण सोल्यूशन्स प्रदाता बनले आहे.


नेक्स्ट एज्युकेशन बी२बी२सी मॉडेलवर कार्यरत आहे आणि नाविन्यपूर्ण टर्नकी सोल्यूशन्स ऑफर करते, जेथे सर्व कल्पना, संकल्पना आणि इन-हाउस विकसित केले जातात. हे सोल्यूशन्स आयसीएसई, सीबीएसई आणि २९ हून अधिक भारतीय राज्य मंडळांमध्ये ८ भाषांमध्ये आहेत आणि त्यात अत्याधुनिक डिजिटल कन्टेन्ट, एकीकृत व परस्परसंवादी अभ्यासक्रम आणि शाळांच्या सर्व शैक्षणिक, प्रशासकीय व मूल्यांकन गरजा हाताळणारे क्लाउड-आधारित व्यासपीठ समाविष्ट आहे. या सेवांव्यतिरिक्त कंपनी चोवीस तास समर्थन व सहाय्य देखील प्रदान करते. यासंदर्भात कंपनीने एमईएनए प्रदेशात, तसेच आफ्रिकेत बाजारपेठ उपस्थितीसह जागतिक उपस्थिती प्राप्त केली आहे.


देशातील शैक्षणिक परिदृश्य बदलण्याच्या उद्देशाने कंपनी तंत्रज्ञानाचा वापर करण्यावर, तसेच एआर व व्हीआर-सक्षम लर्निंग टूल्स, एसटीईएम अभ्यासक्रम आणि ब्लॉक-आधारित कोडिंग सिस्टम यांसारख्या अद्वितीय शैक्षणिक सोल्यूशन्सची निर्मिती करण्यावर भर देत आहे. त्यांच्या काही अत्याधुनिक ऑफरमध्ये नेक्स्ट लर्निंग प्लॅटफॉर्म, टीचनेक्स्ट, अकॅडेमिक पार्टनरशीप प्रोग्राम, नेक्स्ट करिक्युलम, नेक्स्ट ३६० आणि इतर अनेक गोष्टींचा समावेश आहे, ज्यामुळे शिक्षण व तंत्रज्ञान यातील पोकळी भरून निघेल आणि प्रत्यक्ष ते डिजिटल अध्यापन व अध्ययनामध्ये एकसंधी परिवर्तन होईल.


"नेक्स्ट एज्युकेशनमध्ये आम्ही के-१२ विभागाच्या सर्व भागधारकांच्या गरजा लक्षात घेत उत्पादने व सोल्यूशन्स विकसित करतो. विद्यार्थ्यांच्या विद्यमान व भावी पिढ्यांना आमच्या ऑफरिंग्जमधून लाभ होऊ शकण्याची खात्री घेण्यावर आमचे लक्ष केंद्रित आहे. आम्ही नेहमीच सर्वोत्तम सेवा देण्याप्रती कटिबद्ध राहू," असे नेक्स्ट एज्युकेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी बीस देव राल्हन म्हणाले.


शिक्षण क्षेत्रात दशकाहून अधिक काळाचा अनुभव असलेल्या नेक्स्ट एज्युकेशनकडे शाळा व्यवस्थापनाला उपयुक्त माहिती देण्याचे, तसेच शाळा कशी तयार करावी व चालवायची याबद्दल सल्ला देण्याचे कौशल्य आणि अनुभव आहे. ते उत्तम शालेय वातावरणाची निर्मिती करतात, जे दर्जेदार शिक्षण मिळण्याची खात्री देतात.

Post a Comment

0 Comments