भिवंडीत युवक काँग्रेसची ईडी कारवाई विरोधात निदर्शने

 


भिवंडी दि 16(प्रतिनिधी ) मागील तीन दिवसां पासून नॅशनल हेरॉल्ड प्रकरणी काँग्रेस राष्ट्रीय अध्यक्षा सोनिया गांधी ,खासदार राहुल गांधी या विरोधात ईडी ने कारवाई चे फास आवळण्यास सुरवात केली आहे .त्यामध्ये राहुल गांधी यांची सतत तीन दिवस ईडी ने चौकशी सुरु आहे .


त्याविरोधात काँग्रेस पदाधिकारी देशभर निदर्शने करीत असताना भिवंडीत युवक काँग्रेस शहराध्यक्ष राहुल पाटील यांच्या नेतृत्वाखाली उपविभागीय अधिकारी कार्यालया बाहेर निदर्शने करीत केंद्र सरकार ,प्रधानमंत्री व ईडी विरोधात जोरदार घोषणाबाजी करीत निषेध नोंदविला आहे .


युवक काँग्रेस अध्यक्ष राहुल पाटील ,अल्पसंख्याक शहराध्यक्ष इकबाल सिद्दीकी, रेहाना अन्सारी, युवक प्रभारी गायत्री सेन यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या निदर्शनात अनेक युवक कार्यकर्ते सहभागी झाले होते.त्यानंतर उपविभागीय अधिकारी कार्यालयात उपस्थित नायब तहसीलदार गोरख फडतरे यांना आपले निवेदन दिले.

Post a Comment

0 Comments