आरपीएफ आयजी डीबी कासार राष्ट्रपति पोलीस पदक पुरस्काराने सम्मानित

दिल्लीच्या विज्ञान भवन येथे रेलमंत्री अश्विनी कुमार वैष्णव यांच्याहस्ते पुरस्काराचे वितरण

 

कल्याण : नवी दिल्लीतील विज्ञान भवन येथे दक्षिण पूर्व रेल्वे आरपीएफ आयजी डीबी कासार यांना रेल्वेमंत्री अश्विनी कुमार वैष्णव यांच्याहस्ते सन २०२० च्या राष्ट्रपती पोलीस पदकाने सन्मानित करण्यात आले. यावेळी रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.त्यांना रेल्वेच्या माध्यमातून महिला, लहान मुलांची तस्करी, आतंकवादी कारवायांपासून बचाव मोहीम आखण्यासाठी तज्ञ मानले जाते. याव्यतिरिक्त गुन्हेगारी रोखण्यासाठी, रेल्वेची संपत्ती, प्रवासी यांच्या सुरक्षेसाठी सकारात्मक काम केले आहे.

Post a Comment

0 Comments