कल्याण : आम आदमी पक्ष डोंबिवली शहर कमिटीतर्फे मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन आम आदमी पक्ष डोंबिवली कार्यालय येथे करण्यात आले होते.
कोरोनाच्या दुष्परिणामांमुळे बऱ्याच जनतेला डायबिटीज तर काही लोकांना हाय बीपीचा त्रास सुरू झाला आहे. तसेच ह्रदय विकार व अन्य आजार उद्भवले आहेत. म्हणून जनतेला सज्ज व सुदृढ ठेवण्यासाठी त्यांच्या स्वास्थ्याच्या विचार करून आम आदमी पार्टीने या शिबिराचे आयोजन केले होते.
आरोग्य शिबिराचे आयोजन हे आम आदमी पार्टी डोंबिवली शहर कमिटी आणि झेनो हेल्थ तर्फे आप डोंबीवली पक्ष कार्यालय मध्ये करण्यात आले. या कार्यासाठी डोंबिवली टीमचे नेतृत्व विनोद गुप्ता, सीमा साळी, प्रवीण क़ुर्ले, अक्षरा पटेल, सुनील वेंगुलकर, उदय माने, साठेजी व आम आदमी पक्ष कल्याण-डोंबिवलीचे सिद्धार्थ गायकवाड, संदीप नाइक, विनायक मंकिकर, कौस्तुभ देशपांडे, सचिन जोशी, मिथिलेश झा, राजेश शेलार,देव मिश्र, तेजस नाईक, रवी केदारे व अन्य कार्यकर्ते उपस्थित असल्याची माहिती दिपक दुबे यांनी दिली.
0 Comments