प्रसिद्ध भारतीय शल्यचीकित्सक डॉ. संजय ओक यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान
कल्याण : मैत्रकुलचे प्रमुख संचालक आशिष गायकवाड यांना नायरा फाउंडेशनच्या वतीने सायबर इन ट्रायबल एक्सलन्स अवार्ड देण्यात आला असून प्रसिद्ध भारतीय शल्यचीकित्सक डॉ. संजय ओक यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.
प्रतिकूल परिस्थिती असतानाही संघर्ष अटळ ठेवणारे आशिष गायकवाड अगणित अडचणींचा सामना करत आपल्याच नव्हे तर असंख्य विद्यार्थ्यांना त्यांच्या ध्येयाची पायरी चढवण्याकडे वाटचाल करत आहेत. पालघर जिल्ह्यातील विक्रमगड तालुक्यात एका सर्वसामान्य शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या आशिष यांनी १० वि पर्यंतचे शिक्षण घेऊन पुढे मुंबईकडे शिक्षणासाठी वाटचाल करत आजव्हीजेटीआय सारख्या इन्स्टिट्यूट मधून ऑटोमोबाईल मध्ये एम टेक करत आहेत.
किशोर जगताप यांच्या ४० वर्षांच्या सामाजिक, संघर्षात्मक तसेच रचनात्मक कारकिर्दीत आशिष गायकवाड देखील गेले १६ वर्ष त्यांचं शिक्षण सांभाळून किशोर जगताप यांच्यासोबत काम करत आहेत.
तसेच जगताप यांनी पाच वर्षांपापूर्वी सुरू केलेले "मैत्रकूल जीवन विकास केंद्र" जिथे गोरगरीब, होतकरू, ध्येयवादी, एकल पालकत्व असणारी मुलं अश्या अनेक प्रकारच्या विद्यार्थ्यांचे शिक्षण, आरोग्य तसेच त्यांच्या जीवनाचा सर्वांगीण विकास केला जातो. अश्या मैत्रकूलचे प्रमुख संचालक देखील आशिष गायकवाड आहेत. त्यांचे जगणे हे अनेकांच्या साठी आदर्श असून मैत्रकूल तसेच गणाई परिवाराच्या प्रत्येक सदस्याला त्यांचा सार्थ अभिमान असल्याची भावना यावेळी इतर सदस्यांनी व्यक्त केली.
0 Comments