अर्बन सेलच्या प्रदेशाध्यक्ष खा. वंदना चव्हाण यांनी घेतला आढावा कल्याण-डोंबिवली अर्बन सेल अध्यक्ष प्रविण मुसळे यांनी सादर केला आढावा
कल्याण : मुंबई,पनवेल व ठाणे जिल्ह्यातील राष्ट्रवादी अर्बन सेलच्या अध्यक्षांची आढावा बैठक व कल्याण-डोंबिवलीतील विविध विषय समितींच्या समन्वयक व उपसमन्वयकांचे नियुक्ती पत्र देण्याचा कार्यक्रम खासदार व महाराष्ट्र अर्बन सेलच्या प्रदेशाध्यक्ष वंदना चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. अर्बन सेल मुंबई रिजन कॉर्डीनेटर, अर्बन सेल महाराष्ट्र प्रदेश सदस्य व कल्याण-डोंबिवली अर्बन सेल अध्यक्ष प्रविण मुसळे यांनी आढावा सादर केला. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सर्वांना संघटनेबाबत मार्गदर्शन केले. अर्बन सेल सचिव सुरेश पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
वंदना चव्हाण यांनी अर्बन सेल मध्ये जे लोकोपयोगी कार्य अपेक्षीत आहे त्याबद्दल मार्गदर्शन केले. यामध्ये विविध शहरातील विविध नागरी समस्या, हवामान बदल, वृक्षारोपण, वायू प्रदूषण, गार्डन, खेळाची मैदाने, सायकल ट्रॅक, आरक्षित मैदाने, विकास आराखडा, अनधिकृत बांधकाम अशा अनेकलकोपयोगी विषयांवर त्यांनी मार्गदर्शन केले.
राष्ट्रवादी अर्बन सेलच्या कल्याण डोंबिवली पदाधिकाऱ्यांना नियुक्ती पत्र देऊन त्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या. यामध्ये कल्याण डोंबिवली शहर सुधार व महापालिका समन्वयक आनंद हजारे, उपसमन्वयक अमित खोत, उमेश घाडगे पर्यावरण,शहर सुशोभीकरण व पर्यटन विकास समन्वयक सुचित पवार, उपसमन्वयक बलवंत खंडेलवाल, महिला व बाल कल्याण समन्वयक लक्ष्मी चव्हाण, व्यापारी व उद्योजक समन्वयक अमोल लांडे, क्रीडा समन्वयक अभिषेक कर्णिक, सांस्कृतिक समन्वयक प्रसाद संगीत, विविध स्वयंसेवी संस्थाशी समन्वय व सामाजिक सलोखा समन्वयक प्रकाश चव्हाण, आरोग्य सेवा समन्वयक हर्षद सुर्वे यांची नियुक्ती करण्यात आली.
यावेळी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठांनचे समन्वयक सचिन पाटील, महाराष्ट्र अर्बन सेल समन्वयक नितीन जाधव, मुंबई अर्बन सेल अध्यक्ष निर्मला प्रभावळकर, नवी मुंबई अर्बन सेल अध्यक्ष अॅड. सपना गावडे, भिवंडी अर्बन सेल अध्यक्ष अॅड सुनील पाटील, पनवेल अर्बन सेल अध्यक्ष आदी जानोरकर हे उपस्थित होते. या सर्वांनी आपले मत व्यक्त केले.
0 Comments