कंत्राटी कामगारांच्या मागण्यांसाठी मनसेचा केडीएमसीवर मोर्चा


कल्याण : कल्याण डोंबिवली महापालिकेच्या विविध विभागात कार्यरत असलेल्या कंत्राटी कामगारांना किमान वेतन मिळत नाही. किमान वेतन देण्यात यावे यासह इतर मागण्यांसाठी  महाराष्ट्र नवनिर्माण कामगार कर्मचारी सेनेच्या वतीने आज महापालिका मुख्यालयावर मोर्चा काढण्यात आला. कल्याण पश्चिमेतील सुभाष मैदानातून काढण्यात आलेल्या या मोर्चात मनसेचे नेते आणि संघटनेचे प्रदेशाध्यक्ष संदीप देशपांडेकार्याध्यक्ष संतोष धुरीमाजी आमदार प्रकाश भोईरसंघटनेचे उपाध्यक्ष राजेश उज्जैनकरमनसे जिल्हाध्यक्ष उल्हास भोईरगणेश खंडारे, शहर संघटक रुपेश भोईर आदी पदाधिकारी आणि कंत्राटी कर्मचारी मोठय़ा संख्येने सभागी झाले होते.


यावेळी मनसेने नेते देशपांडे यांच्या शिष्टमंडळाने अतिरिक्त आयुक्त सुनिल पवार यांची भेट घेतली. महापालिकेतील कंत्रटी कामगारांना किमान वेतन दिले जात नाही. कोरोना काळात काम केलेल्या कामगारांना भत्ता दिला गेला नाही. तसेच कोरोना काळात काम करीत असताना निधन झालेल्या कामगारांना  सुरक्षा कवचाची रक्कम मिळालेली नाही. या विविध मुद्यावर देशपांडे यांनी चर्चा केली. तसेच चर्चेला आयुक्त उपस्थित नसल्याने तीव्र नाराजी व्यक्त केली.


यासंदर्भात संघटना २०१८ साली औद्योगिक न्यायालयात गेली होती. न्यायालयाने ही आदेश दिले आहेत. सहाय्यक कामगार आयुक्तांनीही आदेश दिले आहेत. तरी अंमलबजावणी केली जात नाही. अतिरिक्त आयुक्त पवार यांनी शिष्टमंडळाचे म्हणणे ऐकून घेत किमान वेतन आणि  फरकाची रक्कम टप्प्या टप्प्याने देण्याचे मान्य केले आहे.


यावेळी देशपांडे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं कि, महापालिकेची जी आर्थिक स्थिती आहे त्याबाबत पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुढाकार घ्यावा अशी विनंती केली.  हजारो कोटींचे रस्ते बांधत आहात थोडीशी कृपा कल्याण डोंबिवली महापालिकेवर करावीआपल्याच ठिकाणी आपल्याला पैसे मिळणार नसतील तर शासन येवून काय उपयोग असा टोला लगावला. पालकमत्र्यांना शासनाकडून येणारी महापालिकेची थकबाकी द्यावी जेणेकरून कामगारांचे पैसे मिळतील अशी विनंती केली.


राज ठाकरे मास्क वापरत नव्हते, आता दुसऱ्यांदा कोरोना झाला, ऑपरेशनही रखडलं अशी टीका उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नाव न घेता राज ठाकरे यांच्यावर केली होती. उपमुख्यमंत्र्यांच्या या  वक्तव्याचा संदीप देशपांडे यांनी समाचार घेतला. उपमुख्यमंत्री मास्क घालून फिरतात त्यांनाही कोरोना झाला,  राज ठाकरे यांना कोरोना झालेला नाही. त्यांच्यामध्ये कोरोनाचे डेड सेल्स आढळलेत ही गोष्ट त्यांनी लक्षात घेतली पाहिजे अर्धवट माहितीच्या आधारे उपमुख्यमंत्र्यांनी तरी बोलू नये असा टोला अजित पवार यांना लगावला. 

Post a Comment

0 Comments