महाराष्ट्र लोकसेवा आयोग परीक्षेत सी.डी. देशमुख प्रशासकीय प्रशिक्षण संस्थेच्या

 

मेधा कुटे नायब तहसीलदार तर शमा अनुसे यांची कक्ष अधिकारी म्हणून नियुक्ती महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी केले कौतुक


ठाणे 03 : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत राज्यसेवा 2020 या स्पर्धापरीक्षेत ठाणे महानगरपालिकेच्या चिंतामणराव देशमुख प्रशासकीय संस्थेच्या दोन विद्यार्थींनीनी अव्वल यश संपादन केले आहे. कु. मेघा विलास कुटे यांची नायब तहसीलदार तर कु. शमा गणपत अनुसे यांची कक्ष अधिकारी या पदावर निवड करण्यात आली आहे. या दोन्ही विद्यार्थींनीचे कौतुक महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा, अतिरिक्त आयुक्त 1 संदीप माळवी यांनी केले असून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.


            ठाणे महानगरपालिका संचालित चिंतामणराव देशमुख प्रशासकीय प्रशिक्षण संस्था ही केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत घेतल्या जाणाऱ्या परीक्षांना आणि इतर संलग्न परीक्षांना बसणाऱ्या विद्यार्थ्यांना नि:शुल्क मार्गदर्शन करणारी अग्रगण्य संस्था आहे. तसेच अशा पध्दतीचे प्रशासकीय प्रशिक्षण संस्था चालविणारी देशातील ठाणे महानगरपालिका ही एकमेव महानगरपालिका आहे.


            महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत राज्यसेवा 2020 ही स्पर्धा परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेचा अंतिम निकाल 30 मे 2022 रोजी घोषित करण्यात आला. या परीक्षेत चिंतामणराव प्रशासकीय प्रशिक्षण संस्थेतील कु. मेघा विलास कुटे व कु. शमा गणपत अनुसे या विद्यार्थींनीनी जिद्दीने, मेहनतीने यश संपादन केले असून संस्थेने केलेल्या मार्गदर्शनाचाही त्यांना फायदा झाला असल्याचे त्यांनी नमूद केले.


          यावेळी या दोन्ही विद्यार्थीनींनी महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा, अतिरिक्त आयुक्त 1 संदीप माळवी, संस्थेचे संचालक महादेव जगताप तसेच सर्व अधिकारी, कर्मचारी यांचे आभार व्यक्त केले आहे

Post a Comment

0 Comments