स्केटिंग खेळाडूंचा ९६ तास स्केटिंग चालवण्याचा विक्रम

 


कल्याण बेळगाव येथील शिवगंगा स्केटिंग क्लब येथे गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डसाठी पार पडलेल्या स्केटिंग विक्रमामध्ये ठाणे जिल्हा मधील मीरारोड येतील स्केटलाइफ क्लब च्या ३३  खेळाडूंनी ९६ तास स्केटिंग चालवण्याचा नवा विक्रम प्रस्थापित केला आहे.


 

 रोट्रॅक क्लब  बेळगाव येथे नुकताच हे गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद होण्यासाठी ९६ तासाचे लार्जेस्ट स्केट मोटो फार्मेशन स्केटिंगचा विक्रम करण्यात आला. या रेकॉर्डसाठी संपूर्ण भारतातून ४९६ खेळाडू सहभागी झाले होते. त्यामध्ये ठाणे जिल्ह्यातील ३३  खेळाडूंचा समावेश होता. या सर्व खेळाडूंचे ठाणे जिल्ह्यामध्ये कौतुक होत असून सर्व खेळाडूंना  प्रशिक्षक संतोष मिश्राप्रफुल खरात आणि अमित मिश्रा यांचे मार्गदर्शन मिळाले.


 

या विक्रमवीर खेळाडूंमध्ये अयान नेत्रप्रद्युन रेड्डीरितेश रेड्डीजिया जियाल, अजिता जियालदिव्यांश जियाल, एम. विश्वकर्मा, अर्जित जोयाशी, अरमान सय्यद, आद्य बरनवाल, अर्जुन कामठ, आध्या कामठ, अर्णव थोरात, ऋषित तिवारी, स्वस्वत परीदा, अनिया भारती,

देवांश खन्ना, अभिनव नवरी, अक्ष्य नवरी, दियान सैनी, तनिश गुच्छायत, अंश साळुंखे, अंश वर्मा, अन्विता बुटे, तेजस मोहंती, हर्षिता पाष्टे, हृदान जोशी, चाहत पायणे, प्रज्ञा पायने, वीर गजरा, मयांक चौधरी, जयेश चौधरी, सर्वेश कोचरेकर यांचा समावेश होता.

Post a Comment

0 Comments