टिटवाळा येथे जागतिक योग दिन साजरा


कल्याण : सिद्धिविनायक युवा संस्था टिटवाळा व विनायक मार्शल आर्ट्स आणि फिटनेस झोन यांच्या वतीने दरवर्षी प्रमाणे या वर्षी देखील जागतिक योगा दिवस साजरा करण्यात आला. प्रथमेश हॉल टिटवाळा येथे आयोजीत करण्यात आलेल्या या योग दिनाच्या कार्यक्रमात अनेक युवक व युवतींनी सहभाग नोंदविला होता.


या कार्यक्रमाच्या सुरवातीला सर्व सहभागीना योग म्हणजे कायआंतरराष्ट्रीय योग दिनाचे महत्त्व पटवून देण्यात आले. राज्य युवा पुरस्कार विजेते विनायक कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजीत करण्यात आलेल्या या कार्यक्रमात क्रीडा प्रशिक्षक हरीष वायदंडे यांनी योगासनाचे विविध प्रकारांचे प्रात्यक्षिक करुन दाखवून उपस्थित सर्वांकडून ते करवून घेण्यात आले.


क्रीडा प्रशिक्षक विनायक कोळी यांनी प्राणायाम म्हणजे कायते करण्याची योग्य व अचूक पद्धत कोणती या विषयावर मार्गदर्शन केले तसेच प्राणायामाचे विविध प्रात्यक्षिक करून दाखवून उपस्थित सर्वांकडून ते करवून घेण्यात आले.


          कार्यक्रमाच्या समारोप प्रसंगी विनायक मार्शल आर्ट्स आणि फिटनेस झोन चे खेळाडू आदर्श मौर्यभुषण जाधवसंदेश देवरेअंशुल साहू आणि सिद्धी गायकवाड यांनी योगाचे अद्यावत प्रात्यक्षिके सादर करुन उपस्थितांची मने जिंकून घेतली. तसेच आताच लागलेल्या १० वी च्या निकालात 96.40 टक्के मार्क मिळवून टिटवाळा शहरातुन पहिला आलेला हर्ष मयेकर याचा विशेष सत्कार करण्यात आला.


Post a Comment

0 Comments