स्त्री शक्ति पंतप्रधानांच्या सोबत – चित्रा वाघभाजपाच्या महिला बचत गट व लाभार्थी मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद

 


कल्याण : "स्त्री शक्ति ही आता जागृत होत असून प्रत्येक क्षेत्रात कर्तुत्व गाजवत आहे. त्याच प्रमाणे खरे खोटे याची तिला जाण असून कोणी कितीही नरेंद्र मोदी यांच्या संदर्भात महागाई किंवा भाववाढि वरून अफवा पसरवल्या तरी त्याचा काही उपयोग नाही उलट स्त्री शक्ति पंतप्रधानांच्या सोबत असल्याचे मत भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी व्यक्त केले.


पंतप्रधान नरेंद्र मोदीयांच्या कार्यकाळाला आठ वर्ष पूर्ण होत आहेत. या आठ वर्षात देशाने विसकसनशील ते विकसित देशाच्या वाटचालीस अत्यंत जलद गतीने सुरवात केली आहे. यासाठी कल्याण जिल्हा महिला मोर्चाच्या वतीने जिल्हाध्यक्ष रेखा राजन चौधरी यांच्या नेतृत्वाखाली कल्याण पश्चिमेतील श्री सिद्धिविनायक हॉल येथे महिला बचतगट व लाभार्थी मेळावा घेण्यात आला. याला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.


 या कार्यक्रमाला केंद्रीय पंचायत राज मंत्री कपिल पाटील, महिला मोर्चा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघमाजी मंत्री जगन्नाथ पाटील, आमदार गणपत गायकवाड, माजी आमदार नरेंद्र पवार, जिल्हाध्यक्ष शशिकांत कांबळेप्रदेश कार्यकरणी निमंत्रित सदस्य उज्ज्वला दुसानेमहाराष्ट्र प्रदेश सचिव प्रिया शर्माजिल्हा उपाध्यक्ष नाना सूर्यवंशी, मंडळ अध्यक्ष प्रेमनाथ म्हात्रे, महिला मोर्चा मंडळ अध्यक्षा ज्योती भोईर, आदि मान्यवर उपस्थित होते.


तर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वत:ला देशाचे चौकीदार बनायचे आहेअसे निवडणूक प्रचार दरम्यान सांगितले होते. त्यांनी खरेच देशाचे संरक्षण केले आहे. त्यामुळे गेल्या आठ वर्षात एकाही केंद्रीय मंत्रयावर भ्रष्टाचाराचा आरोप कोणालाच लावता आलेला नाही. मोदी यांनी देशाचे रक्षण करण्याची जबाबदारी या चौकीदाराच्या माध्यमातून पूर्ण केली असल्याचे मत कपिल पाटील यांनी व्यक्त केले.

Post a Comment

0 Comments