महिला काँग्रेसच्या वतीने पालिका रुग्णालयात शितपेयाचे वाटप


कल्याण : महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षा संध्या सव्वालाखे यांच्या आदेशाने आणि अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव संजय दत्त यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष  नाना पटोले यांच्या वाढदिवसा निमित्त कल्याण डोंबिवली महिला काँग्रेस कमिटीच्या जिल्हाध्यक्ष कांचन योगेश कुलकर्णी यांच्या वतीने कल्याण पश्चिम मधील रुक्मिणीबाई शासकीय रुग्णालय येथील रुग्णांना,डॉक्टरांना आणि कर्मचाऱ्यांना थंडपेय वाटप करण्यात आले होते.


ह्या वेळी प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना महिला जिल्हाध्यक्ष कांचन कुलकर्णी यांनी सांगितले की देशात सतत होणाऱ्या वाढत्या महागाईने गोरगरीब जनता होरपळून गेली आहे. त्यांना क्षणभर का होईना दिलासा देण्यासाठी सदर उपक्रम राबविण्यात आला आहे. या कार्यक्रमाला महिला काँग्रेसच्या ब्लॉक अध्यक्ष शबाना शेख,भारती पवार,रोहिणी कोलते,सुशांत जाधव,हाजी शेख आदी काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments