रेल्वे हद्दीतील गेट नंबर २ रिक्षास्टॅण्ड बंद असल्यामुळे रिक्षाचालक आक्रमक रिक्षा बाहेर लावल्यामुळे होते वाहतूक कोंडी


कल्याण : रेल्वे हद्दीतील गेली तीस वर्षे जुना गेट नंबर २ येथील रिक्षा स्टॅण्ड रेल्वे प्रशासनाने कोरोना कालवधी पासून बंद केला आहे. रेल्वे प्रशासनाचा हा निर्णय अन्यायकारक असून त बाहेर रिक्षा लावल्याने वाहतूक कोंडी होते. यामुळे वाहतूक पोलीस रिक्षा चालकांकडून दंड आकारात असून रोजच्या या त्रासाला कंटाळून रिक्षाचालक संतप्त झाले असून या रिक्षाचालकांनी शिवसेनेचे जेष्ठ नगरसेवक तथा माजी सभापती रमेश म्हात्रे यांची भेट घेऊन आपली समस्या मांडली आहे. याबाबत लवकरच खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आणि रेल्वे अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेऊन हा प्रश्न निकाली काढण्याचे आश्वासन रमेश म्हात्रे यांनी या रिक्षा चालकांना दिले आहे. यावेळी समाजसेवक विक्की म्हात्रे, जगदीश राठोड, अन्नू डोंगरे आदींसह मोठ्या संख्येने रिक्षाचालक उपस्थित होते.


रेल्वे स्टेशन परिसरात स्मार्ट सिटी अंतर्गत सॅटीचे काम सुरु आहे. सँटीस काम सुरू असताना प्रशासनाकडुन वाहतूक व्यवस्था संदर्भात नियोजन व उपाययोजना केलेल्या नाहीत यामुळे वाहतुक व्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे.  महापालिकारेल्वेस्मार्ट सिटीआरटीओवाहतुक पोलिस प्रशासनाचे समन्वय नाही. रेल्वे प्रशासनाने होम प्लॅटफॉर्म क्रमांक १ समोरील जुने रिक्षा स्टॅण्ड पर्यायी व्यवस्था न करता कोरोना कालवधी पासून बंद केले होते. यातील दोन स्टॅण्ड  सुरु केले असून गेट नंबर दोन येथील रिक्षास्टॅण्ड अद्यापही बंदच आहे. यामुळे सुमारे ४०० हून अधिक  रिक्षा बाहेर उभ्या कराव्या लागत आहे. येथील रिक्षा या कल्याण पूर्वेतील नेतिवली, चक्कीनाका, चेतना, नांदिवली, काका ढाबा याठिकाणी प्रवासी वाहतूक करतात. 


 नियोजना अभावी स्टेशन परीसरात नित्यरोज वाहतुक खोळबुंन वाहतुक विस्कळीत होत आहे. त्याचे खापर नाहक रिक्षा चालकांवर फोडले जात आहे. नित्यरोज वाहतुक पोलिसांकडुन होणारा हजारो रुपये दंड नाहक रिक्षा चालकांना भरावा लागत आहे. रिक्षा वाहतुक सार्वजनिक प्रवासी व्यवस्था प्रमुख घटक आहे. महापालिकारेल्वेस्मार्ट सिटीआरटीओवाहतुक पोलिसपोलिस प्रशासन यांची एक समन्वय समिती नेमून स्टेशन परिसरातील वाहतुक व्यवस्था व रिक्षा स्टॅण्ड बाबत तातडीने निर्णय घ्यावेत अशी मागणी रिक्षा चालक करत आहेत.


तर रिक्षा टॅक्सी चालक मालक असोसिएशनतर्फे रिक्षा चालकांकडून दररोज दहा रुपयांची पावती घेतली जाते मात्र गेट नंबर २ रिक्षा स्टँड आत घेण्यासाठी मदत केली जात नसल्याचा आरोप या रिक्षाचालकांनी केला आहे.   याबद्दल रिक्षा टॅक्सी चालक मालक असोसिएशनचे अध्यक्ष प्रणव पेणकर यांना विचारले असता, होम प्लॅटफॉर्म नंबर एक येथील तिन्ही रिक्षा स्टॅण्ड कोरोना काळात रेल्वे प्रशासनाने नियोजित हॉटेल व प्रवासी प्रतिक्षागृह नवनिर्माण याकरिता कायमस्वरूपी बंद करण्यात आले.


हे रिक्षा स्टॅण्ड सुरू करावे म्हणून रिक्षा टॅक्सी चालक मालक असोसिएशन वतीने सतत पाठपुरावा करत असून यापैकी दोन रिक्षा स्टॅण्ड सुरु करण्यात संघटनेला यश आले असून गेट नंबर २ येथील स्टॅण्ड सुरु करण्यासाठी देखील पाठपुरावा सुरु असल्याचे त्यांनी सांगितले. 

Post a Comment

0 Comments