भाजपने भविष्यवाणी करण्याऐवजी जनता ठरवेल...

 


डोंबिवली ( शंकर जाधव ) स्व.लोकनेते दि.बा.पाटील यांचे नाव नवी मुंबई विमानतळाला द्यावे ह्या मागणीसाठी सरकारविरोधात आंदोलन झाले.शनिवारी प्रगती विद्यालयाच्या सभागृहात याच विषयावर लोकनेते दि.बा. पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ सर्वपक्षीय कृती समिती मार्फत  दि.बा.पाटिल यांच्या  24 जून रोजी स्मृती दिनाच्या नियोजनाची पूर्वतयारीची चर्चा करण्यासाठी सभा पार पडली. 


या बैठकीला सर्व पक्षीय कृती समितीचे अध्यक्ष  दशरथ पाटील, माजी मंत्री  जगन्नाथ पाटील , महाराष्ट्र काँग्रेस कमिटी प्रदेश सचिव संतोष केणे, गुलाब वझे, शरद पाटील, चंद्रकांत पाटील आदीसह अनेक  मान्यवर उपस्थित राहणार आहेत.


यावेळी माजी मंत्री जगन्नाथ पाटील यांनी 2024 मध्ये पुन्हा मोदी पंतप्रधान होतील असे सांगितल्यावर काँग्रेस पदाधिकारी संतोष केणे संतापले.केणे यांनी व्यासपीठ सोडून जाण्याच्या प्रयत्न केला असता मान्यवरांनी त्यांची समजूत काढून थांबविले.पुढील पंतप्रधान कोण होईल हे जनता ठरविलं  असे उत्तर दिले.

Post a Comment

0 Comments