युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली असंख्य शिवसैनिक व युवासेना पदाधिकारी राम जन्मभूमी आयोध्या कडे रवाना…


ठाणे, प्रतिनिधी : - आज ठाणे, कल्याण -डोंबिवली, अंबरनाथ,  बदलापूर, नवी मुंबई, मीरा भाईंदर या शहराबरोबर पश्चिम महाराष्ट्रातील युवासेना पदाधिकारी व शिवसैनिक महाराष्ट्र राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्यजी ठाकरे साहेब यांच्या नेतृत्वाखाली प्रभू राम जन्मभूमी अयोध्याकडे दर्शनासाठी ठाणे, कल्याण या रेल्वे स्थानकातून रवाना झाले आहे. त्यावेळी ठाणे रेल्वे स्थानकात असंख्य शिवसैनिकांची गर्दी फलाटावर लोटली होती.


महाराष्ट्र राज्याचे नगर विकास मंत्री एकनाथजी शिंदे यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे ठाणे रेल्वे स्थानकात युवासेना सचिव वरून सरदेसाई यांच्या प्रमुख उपस्थितीत, खासदार राजन विचारे, ठाणे जिल्हाप्रमुख नरेशजी म्हस्के, कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे यांनी झेंडा दाखवून रेल्वे आयोध्या कडे रवाना करण्यात आली.


त्यावेळी ठाणे  विधानसभा शहर प्रमुख हेमंत पवार, उपशहर प्रमुख जगदीश थोरात,नगरसेवक प्रकाश शिंदे, एकनाथ भोईर, बबन मोरे, युवा विस्तारक राहुल लोंढे, युवा अधिकारी नितीन लांडगे, निखील बुडजडे, भारतीय विद्यार्थी सेना ठाणे जिल्हा प्रमुख सुनील पाटील, उत्तर भारतीय विधानसभा प्रमुख विक्रम प्रताप सिंग, गुलाबचंद दुबे, नवी मुंबईचे उपजिल्हाप्रमुख मनोज हळदणकर, मनोज इसवे, दिलीप घोडेकर, राजू पाटील, बाळा गवस व इतर शिवसेना व युवासेना सर्व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


आज युवसेना प्रमुख तसेच महाराष्ट्र राज्याचे पर्यावरण मंत्री मा. आदित्यजी ठाकरे साहेब यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सर्व युवासेना व शिवसेना पदाधिकारी आयोध्येकडे रवाना होत आहेत. दि.15 जून २०२२ रोजी आदित्यजी ठाकरे साहेब यांच्या नेतृत्वाखाली सकाळी प्रभू रामचंद्रांचे दर्शन करून सायं. ७:०० वा. शरयू नदीच्या काठावर महाआरती करून परतीचा प्रवास करणार आहेत. 

Post a Comment

0 Comments