मिवीने ड्युओपॉड्स एफ४० लॉन्च केले १,१९९ रूपये दरात फ्लिपकार्ट व मिवी वेब साइटवर उपलब्ध ~

 


मुंबई, 8 जून २०२२: मिवी या भारतातील आघाडीच्‍या स्वदेशी इलेक्ट्रॉनिक्स कंपनीने आज नाविन्यपूर्ण व 'ट्रूली मेड इन इंडिया' वायरलेस ड्युओपॉड्स मिवी एफ४० लॉन्च केले आहेत. ड्युओपॉड्स दीर्घकाळापर्यंत टिकणा-या बॅटरीसह एकसंधी कनेक्टीव्हीटी देण्यासाठी डिझाइन करण्यात आले आहेत.  ड्युओपॉड्सची किंमत १,१९९ रूपये असेल आणि सफेद, काळा, करडा, हिरवा व निळा या पाच आकर्षक रंगांच्या व्हेरिएण्ट्समध्ये फ्लिपकार्ट व मिवी वेबसाइटवर उपलब्ध असतील.


मेड इन इंडिया ड्युओपॉड्समध्ये तुमच्या आवडत्या गाण्यांमधील प्रत्येक तालाचा आनंद देणारे स्टुडिओ-क्वॉलिटी साऊंड देण्यासाठी १३ मिमी इलेक्ट्रो-डायनॅमिक ड्रायव्हर्स आहेत. मिवी ड्युओपॉड्स एर्गोनोमिक व वजनाने हलक्या इअरबड्ससह देखील येतात, जे कानामध्ये आरामशीरपणे फिट बसतात. यामध्ये ड्युअल मायक्रोफोन्स आहेत, ज्यामधून युजर्सना सुस्पष्टपणे आवाज ऐकू येण्याची खात्री मिळू शकते. या डिवाईसमध्ये अधिक सोयीसुविधेसाठी सिरी व गुगल असिस्टण्ट सारखे बिल्ट-इन असिस्ण्ट्स आहेत. तसेच युजर्स इअरबड्सवरील एका टॅपमध्ये गाणी बदलू शकतात आणि कॉल्‍स घेऊ किंवा नाकारू शकतात.


मिवीच्या सह-संस्थापक व सीएमओ मिधुला देवभक्तुनी म्हणाल्या, "मिवी एफ४० हा नवोन्मेष्कारी व अद्वितीय मिवी उत्पादनांच्या व्यापक सिरीजमधील नवीन भर आहे. आमचे नवीन ड्युओपॉड्स दर्जात्मक ट्रू वायरलेस इअरबड्सचा शोध घेणा-यांना सर्वोत्तम म्युझिक अनुभव देण्यासाठी डिझाइन करण्यात आले आहेत. ते किफायतशीर दरामध्ये सर्वोत्तम साऊंड देतात. ग्राहकांकडून एफ६० ला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळण्यासोबत फ्लिपकार्टवरील सर्व लॉन्च डे सेल्स रेकॉर्डस् मोडून काढल्यानंतर आम्हाला विश्वास आहे की, ग्राहकांना एफ४० ड्युओपॉड्स देखील आवडतील आणि मिवी उत्पादनांवर प्रेमाचा वर्षाव करण्यासोबत त्यांचा विश्वास कायम ठेवतील."


फिदर लाइट मिवी ड्युओपॉड्स एका चार्जमध्ये ७० टक्के व्हॉल्युमसह जवळपास ५० तासांपर्यंत प्‍लेटाइम देऊ शकतात. ज्यामुळे युजर्स विनाव्यत्यय कॉलचा, दीर्घकाळापर्यंत गाणी ऐकण्याचा आणि मित्र व कुटुंबियांसोबत दीर्घकाळापर्यंत बोलण्याचा आनंद घेऊ शकतात. यामध्ये जलद पेअरिंगसाठी सर्वात अद्ययावत ब्ल्यूटूथ ५.१ वायरलेस कनेक्टीव्हीटी आहे.


यामध्ये सुपरफास्ट चार्जिंग केस आहे आणि तुम्‍ही यूएसबी टाइप-सी पोर्टचा वापर करत केस चार्ज करू शकता. बॅटरी केसवरील एलईडी डिस्प्ले युजर्सना त्यांच्या पॉवर वापरावर देखरेख ठेवण्याची आणि चार्ज चुकवण्यास टाळण्याची सुविधा देतो. मिवी ड्युओपॉड्स एफ४० उत्पादन दोषांसंदर्भात १ वर्षाच्या वॉरंटीसह येतात.

Post a Comment

0 Comments