ठाणे दि. २० ( जि. प) : आरटीई प्रवेशाच्या दुसऱ्या प्रतीक्षा यादीनुसार निवड झालेल्या बालकांना उद्या २१ जून २०२२ पर्यंत प्रवेश निश्चित करता येणार आहे. त्यामुळे जास्तीत जास्त पालकांनी पाल्याचे प्रवेश निश्चित करण्याचे आवाहन प्राथमिक शिक्षणाधिकारी डॉ. भाऊसाहेब कारेकर यांनी केले आहे.
आरटीई प्रवेशाची काही दिवसांपूर्वी दुसरी प्रतीक्षा यादी जाहीर करण्यात आली होती. या यादीत ७१० बालकांची निवड करण्यात आली होती. यंदा आरटीई प्रवेशप्रक्रियेसाठी ६४८ शाळांचा समावेश होता. एकूण १२ हजार २६७ जागा होत्या. त्यापैकी आतापर्यंत ८३४५ बालकांनी प्रवेश निश्चित केला आहे.
प्रतीक्षा यादीतील बालकांचे प्रवेश घेण्याकरता पालकांनी अलॉटमेंट लेटरची प्रिंट आणि आवश्यक कागदपत्रे घेऊन संबंधित तालुका /महानगरपालिकेच्या पडताळणी केंद्रावर जावे आणि पडताळणी समितीकडून आपला प्रवेश निश्चित करावा ,तसेच प्रवेश निश्चित झाल्याची पावती व कागदपत्रे शाळेत जमा करून प्रवेश निश्चित करावा.
0 Comments