राष्ट्रवादीच्या उत्तर भारतीय सेल कार्यालयाचे उदघाटन जिल्हा कार्याध्यक्ष वंडार पाटील यांच्या हस्ते झाले उदघाटन


कल्याण : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी युवक काँग्रेस उत्तर भारतीय सेलचे कल्याण ग्रामीण अध्यक्ष सुनील सिंह यांच्या गोळवली येथील जनसंपर्क कार्यालयाचे उदघाटन राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते आणि कल्याण डोंबिवली जिल्हा कार्याध्यक्ष वंडार पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.


कल्याण डोंबिवली महापालिकेच्या निवडणुकीचे बिगुल वाजले असून सर्वच पक्ष तयारीला लागले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी देखील आपली ताकद वाढवत असून आगामी निवडणुकीत जास्तीत जास्त यश मिळविण्यासाठी सर्व प्रकारे प्रयत्न सुरू आहेत. याचाच एक भाग म्हणून राष्ट्रवादीच्या उत्तर भारतीय सेलच्या कार्यालयाचे गोळवली येथे उद्घाटन करण्यात आले आहे.


यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे ठाणे जिल्हा अध्यक्ष सुधीर पाटील, युवक काँग्रेस कल्याण डोंबिवली जिल्हा अध्यक्ष राज जोशी,राष्ट्रवादी युवक काँग्रेस उत्तर भारतीय सेल कल्याण ग्रामीण अध्यक्ष सुनील  सिंह, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस कोकण विभाग अध्यक्ष किरण शिखरे आदी मान्यवर उपस्थित होते.


या कार्यालयाद्वारे जास्तीत जास्त उत्तर भारतीय समाजाशी संपर्क करण्यात येणार असून या नागरिकांच्या अडी अडचणी, समस्या सोडवण्यासाठी हे कार्यालय नेहमी सज्ज असेल अशी माहिती जिल्हा कार्याध्यक्ष वंडार पाटील यांनी दिली. 


या उद्घाटन प्रसंगी विश्वास आव्हाड, डॉ. गौतम, संतोष जाधव, सागर सिंह, रणजित सिंह, राकेश तिवारी, विनोद गुप्ता, राहुल यादव, अरुण झा, राजेश सिंह, छबिलाल पासवान, अरुण यादव आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments