मनसेमुळे वृद्ध महिला रुग्णाला मिळाला डिस्चार्ज


कल्याण : हॉस्पिटलमध्ये ऑपरेशनसाठी दाखल असलेल्या वृद्ध महिला रुग्णाला हॉस्पिटल मधून बिल न भरल्याने डिस्चार्ज देत नव्हते हि बाब मनसे शहर संघटक रुपेश भोईर यांना समजताच त्यांनी मध्यस्थी करत या वृद्ध महिलेचे बिल कमी करून देत या रुग्णाला डिस्चार्ज देखील मिळवून दिला.गुरुवारी कल्याण मध्ये फोर्टीस हॉस्पिटल मध्ये एका वयोवृद्ध महिलेला पिताश्याचे ऑपरेशन आणि उपचारासाठी दाखल केले होते. ऑपरेशन यशस्वीरीत्या पूर्ण झाले आणि औषध उपचार दिल्यानंतर फोर्टीस हॉस्पिटलने त्यांना ऑपरेशन आणि उपचाराचे बिल दिले ते त्यांच्या आवाक्याबाहेरचे होते.हे बिल आधी ४ लाख  ८० हजार होते पण ते हॉस्पीटलने बिल वाढवून ९ लाखा पर्यंत नेले. या वयोवृद्ध महिलेला कोणी नाही एक तरुण मुलगा होता पण काही दिवसांपूर्वी हृदय विकाराच्या झटक्याने त्याचा मृत्यू झाला. महिलेच्या नातेवाईकानी कसेबसे थोडे बिल भरले परंतु पूर्ण बिल भरू न शकल्यामुळे हॉस्पीटल त्या महिलेला डिस्चार्ज देत नव्हते.


 

नातेवाईकांनी बराच प्रयत्न करूनकाही सामाजिक संस्थांकडून आणि राजकीय नेत्यांकडून मदतीचा हात मागितला पण कोणीही त्यांना मदत करण्यासाठी पुढाकार घेतला नाही. त्या परिसरांमध्ये मनसेचे शहर संघटक रुपेश भोईर यांचे मदतकार्य सर्वश्रुत आहे. महिलेच्या एका नातेवाईकांनी रुपेश भोईर यांना मदतीची हाक मारली. वेळ रात्रीचे अकरा वाजून गेले होते.            रुपेश भोईर यांनी फोर्टीस हॉस्पिटल ला भेट देऊन मनसेच्या कार्यपद्धतीने प्रकरण मिटवले व बिल माफ करून त्यांना डिस्चार्ज मिळवून दिला. त्या वयोवृद्ध महिलेनी भोईर यांचे आभार मानून असेच मदत कार्य पुढे करत राहण्यासाठी आशीर्वाद दिले. रुपेश भोईर यांनी फोर्टिस हॉस्पिटलचे जे सहाय्यक, परिचारिका आणि अकाउंट विभागामध्ये अधिकारी होते त्या सर्वांचे आभार मानून सहकार्य करून बिल माफ करून दिल्याबद्दल धन्यवाद दिले.

Post a Comment

0 Comments