कल्याण डोंबिवली शहरातील विजेचा लपंडाव तात्काळ थांबवा, अन्यथा महावितरण कार्यालयावर आंदोलन करणार

माजी आमदार नरेंद्र पवार यांचा महावितरणला ७ दिवसांचा अल्टिमेटम


कल्याण : राज्यात अखंडित व सुरळीत वीजपुरवठा करू असे आश्वासन राज्याचे ऊर्जा मंत्री व महावितरण कडून दिले जात असले तरी मागील काही दिवसांपासून कल्याण डोंबिवली शहरातील विजेचा लपंडाव पाहता या केवळ वल्गना असल्याचे सिध्द झाले आहे.


त्यामुळे पुढील ७ दिवसांच्या आत विजेचा लपंडाव थांबविला नाही तर महावितरण कार्यालयावर तीव्र आंदोलन करणार असल्याचा इशारा कल्याण पश्चिम चे माजी आमदार नरेंद्र पवार यांनी आज दिला आहे. माजी आमदार नरेंद्र पवार यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टी च्या वतीने कल्याण परिमंडळाचे मुख्य अभियंता यांना निवेदन देण्यात आले. यावेळी प्रदेश सचिव प्रिया शर्माअर्जुन म्हात्रेआत्माराम फडसदा कोकणेसंजय कारभारीनीता देसलेमहेश जाधव,शबाना पठाण यांच्यासह भाजपचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.


मागील काही दिवसांपासून दर तासाला अचानक वीज पुरवठा खंडित होणे व विजेच्या तारा एकमेकांना लागून जाळ लागणे असे प्रकार दररोज घडत आहेत. त्यामुळे दवाखानेशिक्षण संस्था यांना नाहक त्रास होत असून लाखो व्यापाऱ्यांचे करोडो रुपयांचे नुकसान होत आहे. इतकेच नव्हे तर अचानक वीज पुरवठा खंडित होत असल्यामुळे शेकडो घरांतील विद्युत उपकरणे खराब झाल्याच्या घटना घडल्या आहेत.


आता पावसाळा सुरू झाला आहेथोड्या पावसात सुध्दा वीज पुरवठा खंडित केला जात आहेत्यामुळे नागरिक अक्षरशः मेटाकुटीला आले आहेत. महावितरणचे स्थानिक कर्मचारी व कामगार यांना या बाबतीत विचारले असता त्यांच्याकडून कोणतेही उत्तर मिळत नाही. इतकेच नव्हे तर नवीन वीज जोडणी घेताना सुरक्षा ठेव घेतलेली असताना सुध्दा आता वाढीव सुरक्षा ठेव घेण्याचा निंदनीय प्रकार केला जात आहेहे तात्काळ थांबवावे असे सुध्दा नरेंद्र पवार यावेळी म्हणाले.


राज्याचे विद्युत मंत्री यांनी प्रत्येक घरात १०० युनिट मोफत वीज देण्याचे दिलेले आश्वासन हवेतच विरले असल्याचे चित्र आहे. मोफत वीज सोडाकिमान अखंडित व सुरळीत वीजपुरवठा व्हावा यासाठी तात्काळ उपाययोजना कराव्या अन्यथा   नागरिकांच्या रोषाला सामोरे जाण्यास तयार राहा असा सज्जड इशाराच नरेंद्र पवार यांनी यावेळी महावितरणला दिला आहे.

Post a Comment

0 Comments