डोंबिवली तील शिवसेनेचे सर्व उमेदवार जिंकणार मंत्री एकनाथ शिंदे यांचा विश्वास


डोंबिवली ( शंकर जाधव ) पालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकी त्रिसदस्यीय पद्धतीने होणार  असली तरी कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेवर शिवसेनेचा भगवा फडकणार.डोंबिवलीतील शिवसेनेचे सर्व उमेदवार जिंकून येथील असा विश्वास नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीत एका कार्यक्रमात ऑनलाईनवर बोलताना दिला.डोंबिवली पश्चिमेकडील आनंद नगर उद्यानाच्या लोकापर्ण सोहळ्या प्रसंगी ते बोलत होते.

 

शिवसेनचे माजी नगरसेवक दिपेश म्हात्रे आणि माजी नगरसेवक जयेश म्हात्रे यांच्या प्रयत्नाने डोंबिवली पश्चिमेकडील आनंदनगर उद्यान लोकापर्ण सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून शिवसेना खासदार डॉ. श्रीकांत शिंदे उपस्थित होते. यावेळी उपजिल्हाप्रमुख राजेश कदम, डोंबिवली शहरप्रमुख राजेश मोरे, प्रकाश म्हात्रे, कविता गावंड, किरण मोंडकर, सागर जेधे, संतोष चव्हाण,  आदि मान्यवर उपस्थित होते.

  

खासदार डॉ. शिंदे यांनी लहान मुलांबरोबर उद्यानामधील रबर मॅट प्ले ग्राउंडचे फीत कापून उदघाटन केले.तर  हिडन फौंटन सुरु केल्याने उपस्थित डोंबिवलीकरांनी टाळ्यांच्या कडकडाट केला.यावेळी मंत्री एकनाथ शिंदे हे ऑनलाईन आले असता उद्यानाचा लोकापर्ण सोहळा पाहताना बच्चेकंपनी उद्यानात खेळताना पाहून आनंद व्यक्त केला. मंत्री शिंदे यांनी उद्यानाचे सुशोभिकरण केल्याबद्दल माजी नगरसेवक दिपेश म्हात्रे आणि जयेश म्हात्रे यांचे कौतुक केले.ते पुढे म्हणाले, शिवसेनेचे नगरसेवक निवडणूक येण्यामागचे कारण आहे कि त्यांची जनतेशी नाळ जोडलेली आहे.


आगामी सार्वत्रिक निवडणुकीत डोंबिवलीतील शिवसेनेचे उमेदवार निवडणूक येथील असा विश्वासहि यावेळी व्यक्त केला. तर खासदार डॉ. शिंदे यांनी कल्याण- डोंबिवली शहराच्या विकासासाठी आजवर केलेल्या कामाची माहिती थोडक्यात सांगितली.पुढे माजी नगरसेवक दिपेश म्हात्रे म्हणाले, डोंबिवलीतील मोठा गाव येथीलखाडी किनारी लवकरच नेचर पार्क बनविणार असून ब्रद वोचिंग हि तयार केले जाईल. तसेच डोंबिवली पुर्वेप्रमाणे पश्चिमेलादेखील गॅस लाईन लवकरच सुरु होणार असल्याचे जाहीर केले.


चौकट

  २०११ साली शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आनंदनगर उद्यानाचे लोकापर्ण करण्यात आले होते.२०२० साली कोरोना संकट आल्यावर उद्याने बंद झाली. या दोन वर्षाच्या कालावधीत माजी नगरसेवक दिपेश म्हात्रे यांनी उद्यानाचे सुशोभिकरण करण्याचे ठरविले. त्यानुसार पालिकेकडून ५० लाख निधी मिळविला .      

Post a Comment

0 Comments