१२ वीच्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा शिवसेने कडून सत्कार


डोंबिवली ( शंकर जाधव ) आयुष्याच्या परीक्षेत बसण्याआधी शिक्षणांची गंगा डोक्यावरून वाहने आवश्यक असते.त्यासाठी आई-वादिल्यांचा आशीर्वाद, गुरुजींची शिक्षा याचबरोबर  मेहनत , चिकाटी, ध्येय, परिश्रम आणि  सकारात्मक विचार हे कुठल्याची परीक्षेत हमखास यश मिळून देते.शिक्षणाच्या परीक्षेत यशाची पायरी चढल्यावर पुढील जीवनात कुठल्या क्षेत्रात  उतरावे असा प्रश्न विद्यार्थ्यांना पडतो. अश्या वेळी विद्यार्थ्यांचा संभ्रम दूर करण्यासाठी शिवसेनेने कडून नेहमीच साथ दिली जाते. कोरोना संकटात ऑनलाईन शिक्षण घेऊनही विद्यार्थी शिकत होते. नुकतेच १२ वीच्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा शिवसेनेने सत्कार करून कौतुकाची थाप दिली.

  

डोंबिवली पश्चिमेकडील गरीबाचा वाडा येथील अनमोल नगरीमधील शिवसेन जनसंपर्क कार्यालयात शिवसैनिक गोरखनाथ ( बाळा ) म्हात्रे यांच्यासह संदीप सामंत,अॅॅड. गणेश पाटील, ,मनोज वैद्य, अवि मानकर यांसह अनेक शिवसैनिकांनी विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. विद्यार्थ्यांना पेन, वही, तुळशीचे रोप, गुलाबाचे पुष्प देऊन कौतुक करण्यात आले. या सत्कार सोहळ्यात विद्यार्थ्यांबरोबर पालकांची शिवसेनेने सत्कार केला.


या वेळी बाला म्हात्रे म्हणाले,विद्यार्थ्यांचा सत्कार करणे आवश्यक असून शिवसैनिकांनी एका दिवसात कार्यक्रमाचे नियोजन केले.विद्यार्थ्यांनी खूप शिकून  देशाबाहेर अटकेपार झेंडा रोवावा अशी अशी आमची इच्छा आहे. आजवर डोंबिवलीतील अनेक विद्यार्थ्यांनी हे शक्य करून दाखवल व यापुढेही पुढील पिढी हे करून दाखवतील.उपस्थित विद्यार्थ्यांनी शिवसेनेचे आभार मनात शिवसेनेने आमच्या पाठीशी सदैव राहावे अशी इच्छा व्यक्त केली.

Post a Comment

0 Comments