एमजी मोटरची सिमेन्ससह भागीदारी

 

शाश्वतपूर्ण भविष्य निर्मिती करिता नवोन्मेष्कारी डिजिटल सोल्यूशन्स विकसित करणार ~


मुंबई, २१ जून २०२२: शाश्वतता-केंद्रित नवोन्मेष्काराशी कटिबद्ध एमजी मोटर इंडियाने अत्याधुनिक डिजिटल तंत्रज्ञानांचा (आयओटी, डेटा अॅनालिटिक्स, प्लाण्ट सिम्युलेशन व माइण्डस्फेअर) लाभ घेत उत्पादकता वाढवण्यासाठी, ऊर्जा व खर्चाची बचत करण्यासाठी आणि त्यांच्या कार्यसंचालनांमधील उत्सर्जन व कार्बनचे प्रमाण कमी करण्यासाठी सिमेन्ससोबत सहयोग केला आहे.


एमजी क्लोज्ड-लूप डिजिटल ट्विन म्हणून माइण्डस्फेअर व प्लाण्ट सिम्युलेशनचा वापर करणारी जगा‍तील पहिली ऑटो ओईएम बनली आहे. सॉफ्टवेअर प्लाण्ट असेट्स व प्रक्रियांना कनेक्ट करू शकते आणि अधिक स्ट्रिमलाइन पेंट प्रक्रियांबाबत माहिती देऊ शकते. ज्यामुळे भावी प्री-ट्रीटमेंट व इलेक्ट्रोको‍टिंग पेंट प्रक्रियेमध्ये १५ टक्के वाढ होऊ शकते.


एमजी मोटर इंडियाच्या मॅन्युफॅक्चुरिंग विभागाचे संचालक रवी मित्तल म्हणाले, "एमजी झपाट्याने बदलत असलेल्या आवश्यकतांची पूर्तता करण्यासाठी आणि इकोसिस्टिम भागीदारांसोबत सहयोग करत नवोन्मेष्कारी सोल्यूशन्स देण्यासाठी सातत्याने विकसित होत आहे. सिमेन्ससोबतचा आमचा सहयोग औद्योगिक डिजिटलायझेशन व इंटेलिजण्ट मॅन्युफॅक्चुरिंगवर लक्ष केंद्रित करतो. हा सहयोग कार्बनचे प्रमाण कमी करण्याप्रती, उत्पादन कार्यक्षमता वाढवण्याप्रती आणि लक्षणीय ऊर्जा व खर्च बचत करणारे सोल्यूशन्स देण्याप्रती आमच्या कटिबद्धतेला अधिक दृढ करेल."


सिमेन्स लिमिटेडच्या डिजिटल इंडस्‍ट्रीजचे प्रमुख सुप्रकाश चौधरी म्हणाले, "आम्ही या विकासाबाबत आनंदित आहोत आणि आम्‍हाला एमजी मोटरसोबतच्या सहयोगाचा अत्यंत अभिमान वाटतो. एमजी मोटरसोबत सहयोगाने आम्ही उत्पादनाचे डिजिटल ट्विन तयार केले आहे. यामुळे एमजीला रिअल-टाइम कार्यरत कार्यक्षमतेचे ऑटोमेशन व देखरेख करत प्लाण्टशी कनेक्ट होता येते. यामधून क्लोज्ड-लूप सिम्युलेशन वातावरणामध्ये रिअल-टाइम डेटाचे प्रगत विश्‍लेषण करत बहुमूल्‍य माहिती मिळते. रिअल व डिजिटल विश्वाचे एकसंधी संयोजन सातत्यपूर्ण विकासासाठी पाया रचते. आम्ही एमजीसोबत आमच्या सहयोगासाठी आणि त्यांना त्यांची भावी ध्येये संपादित करण्यामध्ये पाठिंबा देण्यासाठी उत्सुक आहोत."


एमजीचा ब्रॅण्ड आधारस्तंभ म्हणून नवोन्मेष्कारासह परिवर्तनाला चालना देण्याचा मनसुबा आहे आणि सीएएसई गतीशीलतेच्या दृष्टीकोनाचे पालन करते. धोरणात्मक सहयोग (जसे सिमेन्ससोबत) एमजीला उत्पादकता सुधारण्यासाठी, ऊर्जा बचत करण्यासाठी, उत्सर्जन कमी करण्यासाठी, ग्राहक अनुभव वाढवण्यासाठी आणि विकासाला चालना देण्यासाठी डिजिटल सोल्यूशन्स व कौशल्ये विकसित करण्यासोबत त्यामध्ये अग्रस्थानी राहण्यास सक्षम करतील.

Post a Comment

0 Comments