पुरातत्ववेत्यांनी सांगितला एकवीरा देवीचा अलौकिक इतिहास

 


कल्याण : भक्तजनांचे आणि कार्यकर्त्यांचे एक शिष्ठमंडळ इतिहास संशोधक मंडळ-पुणे येथे गेले होते. इतिहास संशोधक,पुरातत्ववेत्ये पांडुरंग बलकवडे यांनी श्री एकवीरा देवीच्या कार्लेगडावर घडलेल्या अनेक ऐतिहासिक घटनांची अत्यंत मोलाची माहिती या वेळी दिली.आई एकवीरा ही 'वीर माता आहे' असे त्यांनी सांगितले.


किल्याचे,मंदिरांचे,या भूमिचे रक्षण करण्यासाठी बळी देण्याची प्रथा प्राचिन आहे.एकवीरेच्या गडावर बोकड बळी देण्याचा मान इतिहास काळात बलकवडे घराण्याला मिळाला. सप्तसहस्त्री नावजी बलकवडे व त्यांच्या सहकाऱ्यांनी मुघलां बरोबर युध्द केले होते.


मंदिरावर हल्ला करणाऱ्या मंसुरखानचा बदला घेतला होता. इतिहास संधोधन मंडळ-पुणे येथे आलेल्या एकवीरा भक्तांनी देवस्थाना बाबतची लिखित ऐतिहासिक माहिती मिळावी म्हणून विनंती केली. तसेच या विषयावर इतिहास संशोधकांचे व्याख्यान व्हावे अशीही विनंती  केली. 


इतिहास संशोधक आणि भारत इतिहास संशोधक मंडळाचे चिटणीस बलकवडे यांनी त्यास सहमती दर्शवली आहे. या शिष्टमंडळात डॉ.दिनकर नाईक,आगरी कोळी संस्कृती अभ्यासक मोरेश्वर पाटील,सामाजीक कार्यकर्ते सर्वेश तरे,विनोद कोळी,मोतिराम गोंधळी,विजय गायकर,राजेश गायकर,मंगेश भोईर,सुनिल नाईक,किरण दिंडे,ओमकार पावशे,अविनाश भोईर, मंगेश म्हात्रे,संदेश भोईर आदी जण उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments