आर्ट गॅलरी कोविड सेंटरमधील कर्मचारी वेतनापासून वंचित वेतन न दिल्यास भारतीय राष्ट्रीय मजदूर कॉग्रेसचा आंदोलनाचा इशारा


कल्याण : कल्याण डोंबिवली महानगरपालिका अंतर्गत आर्ट गॅलरी कोविड सेंटरमध्ये काम करणाऱ्या डॉक्टरपरिचारिकावार्ड बॉय व इतर कर्मचारी वेतनापासून वंचित असून या कर्मचाऱ्यांचे त्वरित वेतन न दिल्यास ७ दिवसानंतर धरणे आंदोलन करण्याचा इशारा  भारतीय राष्ट्रीय मजदूर कॉग्रेसने पालिका आयुक्तांना दिला आहे.

कल्याण डोंबिवली महानगरपालिका व कंत्राटदार यांनी कोविड सेंटर मार्च मध्ये बंद होवून सुद्धा गेल्या नोव्हेंबर पासून कर्मचाऱ्यांना वेतन देण्यात आलेली नाहीतकर्मचारी वारंवार विचारणा करुन सुद्धा महापालिकेकडून उडवाउडवीची उत्तरे दिली जात आहेत.


शेवटी कर्मचाऱ्यांनी कामगार नेते तथा इंटक महासचिव कोणार्क देसाई यांची भेट घेतली व समस्या मांडली कोणार्क देसाई यांनी ताबडतोब याविषयात महापालिकेच्या आरोग्य विभाग प्रमुखउपायुक्त सा.प्र पालिका आयुक्त यांना निवेदन दिले व कर्मचाऱ्यांना त्वरित थकीत वेतन अदा करावे आणि अशा कंत्राटदारांना भविष्यात कंत्राट देवू नये अशी मागणी केली.


      दरम्यान हे कोविड सेंटर चालवणाऱ्या डॉक्टरकडून कर्मचाऱ्यांना नियुक्ती पत्र देतांना डॉक्टरच्या लेटरहेडवर महापालिकेच्या लोगोचा वापर करण्यात आला आहे. अशाप्रकारे खाजगी व्यक्तीने पालिकेच्या लोगोचा वापर करणे चुकीचे असून पालिकेच्या लोगोचा वापर करणाऱ्या संबंधीतांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी देखील त्यांनी यावेळी केली आहे. 

Post a Comment

0 Comments