कल्याण : कल्याण डोंबिवली महानगरपालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या मातोश्री सुशीला नामदेव सूर्यवंशी यांचे वयाच्या ८२ व्या वर्षी निधन झाले. प्राथमिक शाळेत शिक्षक ते मुख्याध्यापिका हा त्यांचा शैक्षणिक क्षेत्रातील प्रवास त्यांनी देवाळा परिसरात पूर्ण केला. त्यांनी अनेक विघार्थी घडविले.
शिस्त, संस्कार, आर्दश बनविण्याचे धडे त्यांनी विद्यार्थ्यांना देत लोकसेवेचा वसा अखेरपर्यंत सुरू ठेवला. सामाजिक कला, शैक्षणिक, क्रिडा, धार्मिक क्षेत्रात त्यांचे मोलाचे योगदान असल्याने जनसामान्यासाठी त्यांची भरीव कामगिरी होती. त्यांच्या दुखःद् निधनाने पंच क्रोशीतील लोकसेवेचा वसा घेतलेले व्यक्तीमत्व हरपल्याने समाजातील सर्वच स्तरातुन हळहळ व्यक्त होत आहे.
0 Comments