२७ गावातील नागरीकांनी टॅक्स न भरण्याचे मनसे आमदार राजू पाटील यांचे आवाहन २७ गावात सुविधा मिळत नसल्याने मनसे छेडणार आंदोलन


कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रातील २७  गावांना महापालिकेकडून मुलभूत सुविधा दिल्या जात नाहीत मात्र कर वसुली केली जात असल्याचा आरोप मनसेने केला आहे. याबाबत आज मनसे आमदार राजू पाटील यांनी उद्यापासून या गावांमध्ये सुविधा नाही तर कर नाही हे आंदोलन सुरू करण्यात येणार असून या गावांध्ये सुविधा नाही तर नाही या आशयाचे  बॅनर लावून आपण स्वतः नागरिकांना कर न भरण्याचे आवाहन करणार असल्याचं राजू पाटील यांनी सांगितलं. कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रातील २७ गावांमध्ये भेडसावणाऱ्या विविध समस्यांबाबत आज मनसे आमदार राजू पाटील यांनी पालिका मुख्यालयात अधिकाऱ्यांची भेट घेतली.


पाणी प्रश्नासंदर्भात पालक आणि नगरविकास मंत्र्यांना वारंवार विनवण्या केल्या, पत्र दिले. सोशल मिडियावरुन बैठक घेण्याची मागणी केली.  गेल्या वर्षभरात पालकमंत्र्यांनी बैठक दिली नाही, काल मला कळाले की खासदारांच्या मागणीवरुन पालक आणि नगरविकास मंत्र्यांनी मंत्रलयात आज पाण्यावर बैठक बोलाविली आहे. या बैठकीला मला बोलविण्यात आलेले नाही. लोकप्रतिनिधींना डावलून ही बैठक घेतली जात आहे.


मला साधी सूचना देखील दिली गेली नाही. नगरविकास खात्याच्या सचिव प्रतिभा पाटील यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी सांगितले की मला बोलविलेले नाही. पालकमंत्री जर अशा पद्धतीचे राजकारण करत असतील तर ते निषेधार्ह आहे. मात्र  मला बोलविले नसले तरी पाणी प्रश्न सोडवावा लोकांना पाणी मिळू दे  ही अपेक्षा आमदार राजू पाटील यांनी व्यक्त केली आहे. 


कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात सुरू असलेल्या नालेसफाई बाबत मनसे आमदार राजू पाटील यांनी नाराजी व्यक्त केली. पाटील यांनी बोलताना कल्याण डोंबिवलीत नालेसफाईचा बोजवारा उडालाय. महापालिकेचे अधिकारी गेंडय़ाच्या कातडीचे आहेत. त्यांना जर अशी इच्छा असेल आम्ही त्यांना लोळवावं ते आम्ही करणार नाही, त्यामुळे मी यावेळेस नालेसफाईचा पाहणी दौरा देखील केला नाही.


७  गावातील संदप भोपर येथील खदाणीवर एका कुटुंबातील पाच जणांचा बुडून मृत्यू झाला. नांदीवली येथे तात्पुरती उपाययोजना केली गेली. पाण्याचा कोटा वाढवून घ्या अशी मागणी होती मात्र आजतागायत कोटा वाढवलेला नाही.  दिव्यात पाण्याचा कोटा आहे. मात्र २०० कोटीची योजना आणली. त्याऐवजी त्याठिकाणी अमृत योजना आणायला हवी होती. ठेकेदाराचे ७०  कोटीचे ड्यू आहेत असा आरोप आमदार राजू पाटील यांनी केला आहे.

Post a Comment

0 Comments