"द इंडिअन इन्स्टिट्युट ऑफ आर्कीटेक्टस"च्या वतीने पर्यावरण दिनी परिसंवादाचे आयोजन
कल्याण : विकास कामांच्या माध्यमातून कल्याण डोंबिवली बदलत आहे. शहरातील रस्ते, नवनवीन प्रकल्प, सिटी पार्क, प्रारूप आराखड्यातील नवीन शहर, स्मार्ट सिटीच्या माध्यमातून कल्याण डोंबिवलीचा होत असलेला विकासामुळे शहरे नव्याने बदलत असल्याचे सांगत कल्याण डोंबिवली महापालिका आयुक्त डॉक्टर विजय सूर्यवंशी यांनी शहराच्या विकासाबाबदाचे नवनवीन प्रकल्पांची माहिती दिली. "द इंडिअन इन्स्टिट्युट ऑफ आर्कीटेक्टस" च्या कल्याण डोंबिवली केंद्राने पर्यावरण दिना निमित्त आयोजित एका परिसंवादा प्रसंगी ते बोलत होते.
आयुक्त पुढे म्हणाले की हवामान बदलाविरूद्ध सामूहिक कृती करण्याच्या आवश्यक तो जोर दिला पाहिजे. शहराच्या विकासामध्ये कल्याण डोंबिवली महानगर पालिके बरोबर कार्पोरेटर कंपन्या, सामाजिक संस्था, विकासक सारख्याचाही मोलाचे सहकार्य असल्याचे सुर्यवंशी यांनी सांगितले.
"द इंडिअन इन्स्टिट्युट ऑफ आर्कीटेक्टस" च्या कल्याण डोंबिवली केंद्राने पर्यावरण दिना निमित्त एका परिसंवादाचे आयोजन केले होता. ह्या कार्येक्रमामध्ये, कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, मुख्य अभियंता स.र.तुपे तथा महामंडळाचे सल्लागार पि. के. मिराशे उपस्थित होते. मिराशे यांनी वास्तुविशारदांची पर्यावरणाच्या संवर्धना मध्ये खूप मोठी भूमिका आहे असे प्रतिपादन केले.
तर तुपे यांनी महामंडळाने पर्यावरण पुरक केलेल्या विविध उपक्रमांची ओळख करून दिली. संस्थेच्या वतीने वास्तुविशारद ज्योत्स्ना भिसे कार्यवाह, वास्तुविशारद शिरीष नाचणे, सचिव वास्तुविशारद केशव चिकोडी, वास्तुविशारद निमिष दफ्तरी, वास्तुविशारद संदीप पाटील यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होते.
0 Comments