राहुल गांधींच्या इडी चौकशी विरोधात कल्याणात काँग्रेसची निदर्शने


कल्याण : काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना इडीने बजावलेल्या नोटीस आणि त्याबाबत सुरू असणाऱ्या चौकशीनंतर काँग्रेसने आक्रमक पवित्रा घेतल्याचे दिसत आहे. दिल्ली आणि मुंबईपाठोपाठ आज कल्याणातही काँग्रेसने इडीविरोधात निदर्शने केली.


       या आंदोलनात काँग्रेसचे कल्याण डोंबिवली जिल्हाध्यक्ष सचिन पोटे, प्रदेश सरचिटणीस ब्रीज दत्त, महिला जिल्हाध्यक्षा कांचन कुलकर्णी, युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष मनिष देसले, ओबीसी विभाग जिल्हाध्यक्ष जयदीप सानप, अनुसूचित जाती विभाग जिल्हाध्यक्ष सुरेंद्र आढाव, कल्याण पूर्व ब्लॉक अध्यक्ष शकील खान, ओबीसी विभाग शहर अध्यक्ष राजा जाधव, सदस्य मुन्ना तिवारी यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते.


नॅशनल हेरॉल्डमधील आर्थिक व्यवहारप्रकरणी गेल्या दोन  दिवसांपासून राहुल गांधी यांना चौकशीसाठी बोलावले जात आहे. या पार्शवभूमीवर काँग्रेसचे नेते आणि कार्यकर्त्यांकडून ठिकठिकाणी निदर्शने केले जात आहेत. कल्याणमध्ये तहसील कार्यालयाबाहेर आज कल्याण डोंबिवली जिल्हा काँग्रेसच्यावतीने निदर्शने करण्यात आली. यावेळी काँग्रेस पदाधिकारी कार्यकर्त्यांनी मोदी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करत मोदी सरकारचा निषेध नोंदवला.

Post a Comment

0 Comments