प्रथम ‘हिंदु राष्ट्र संसदे’त आदर्श मंदिर व्यवस्थापन अभ्यासक्रम शिकवण्याची सूचना

मंदिरांना मॉल’ आणि तीर्थक्षेत्रांना पर्यटनस्थळे बनवू नकाअशी मागणी 


कल्याण : प्राचीन काळी अंगकोर वाटहम्पीआदी ठिकाणी भव्य मंदिरे उभी करणार्‍या राजे-महाराजांनी त्यांचे उत्तम व्यवस्थापन केले होते. या मंदिरांच्या माध्यमातून गोशाळाअन्नछत्रधर्मशाळाशिक्षणकेंद्र चालवून समाजाला मोलाचे साहाय्य केले जात होते. यामुळेच मंदिरांशी हिंदु समाज जोडलेला असे.


आता मात्र मंदिरांचे इतके व्यापारीकरण झाले आहे कीते (शॉपिंग) मॉल’ होऊ लागले आहेततसेच तीर्थक्षेत्रांना विकासाच्या नावे पर्यटनस्थळ बनवले जात आहे. हे रोखणे आवश्यक आहे. त्यामुळे मंदिरांच्या विश्वस्तांनीतसेच पुरोहितांनी मंदिरांचे आदर्श व्यवस्थापन केले पाहिजे. हे साध्य करण्यासाठी मंदिरांचे आदर्श व्यवस्थापन’ (दी टेम्पल मॅनेजमेंट) हा अभ्यासक्रम चालू करण्याची महत्त्वपूर्ण सूचना प्रथम हिंदु राष्ट्र संसदेत करण्यात आली.
दशम अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशनाच्या द्वितीय दिनी मंदिरांचे सुव्यवस्थापन’ याविषयावरील हिंदु राष्ट्र संसदेत विविध मंदिरांचे विश्वस्तभक्तअधिवक्ते आणि हिंदुत्वनिष्ठ यांनी अभ्यासपूर्ण विचार व्यक्त केले. या संसदेत सभापती म्हणून ओडिशा येथील अनिल धीरउपसभापती म्हणून हिंदु जनजागृती समितीचे धर्मप्रचारक नीलेश सिंगबाळतसेच सचिव म्हणून हिंदु जनजागृती समितीचे आनंद जाखोटिया यांनी कामकाज पाहिले.


       अडीच तास चाललेल्या प्रदीर्घ चर्चेनंतर प्रथम हिंदु राष्ट्र संसदेत हिंदूंची मंदिरे सरकारच्या ताब्यातून मुक्त करून ती भक्तांच्या ताब्यात देण्यात यावीत’,  ‘मंदिरात तेथील कामकाजासाठी केवळ हिंदूंचीच नियुक्ती करण्यात यावी’, ‘मंदिर परिसरात मद्यमांस यांना बंदी असावीतसेच अन्य धर्मियांच्या प्रसारास बंदी असावी’, असे प्रस्ताव संमत करण्यात आले. याला जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम्’ च्या गजरात उपस्थित धर्मनिष्ठांनी अनुमोदन दिले.  


Post a Comment

0 Comments