संघर्ष सेवाभावी संस्था आयोजित रंगाक्षरे पावसाची अम्ब्रेला पेंटिंग कार्य शाळेचे आयोजन

छाया  : अशोक  घाग 

कळवा, प्रतिनिधीः संघर्ष सेवाभावी संस्था आणि अक्षरमुद्रा सुलेखन कला अकादमी* यांच्या संयुक्त विद्यमाने *रंगाक्षरे पावसाची* या *अनोख्या अम्ब्रेला पेंटिंग* कार्यशाळेचे आयोजन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली  व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ठाणे पालघर विभागीय अध्यक्षा सौ. ऋता आव्हाड* यांच्या संकल्पनेनुसार कळवा येथील *कावेरी सेतू येथे दिनांक5/6/2022 रोजी रविवारी* अतिशय उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.


पावसाळ्यात अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपले आहे विविधरंगी छत्री रेनकोटानी बाजारपेठा सजल्या आहेत. पण आपली छत्री स्वतःच्या हाताने रंगवून वापरण्याची मजाच काही और आहे. कळवा येथील सह्याद्री शाळेच्या बाजूला असणाऱ्या कावेरी सेतू रोडवर अक्षरमुद्रा या संस्थेच्या माध्यमातून ५ ते ५० वयोगटातील कळवेकरांनी रंगाक्षरे पावसाची या अनोख्या अम्ब्रेला पेंटिंग कार्यशाळेत सहभाग घेतला या उपक्रमाच्या निमित्ताने लोकांनी आपल्या अंगभूत असणाऱ्या कलेला जागृत करत वेगवेगळ्या प्रकारचे नक्षीकाम केले.


तसेच अक्षरमुद्रा या संस्थेचे श्री. रितेश देशमुख यांच्याकडून सामाजिक संदेश तसेच कॅलिग्राफी  आपल्या आवडीनुसार करून घेतली.या उपक्रमाला स्वतः ऋताताई आव्हाड उपस्थित होत्या. कळव्यात वेळोवेळी उपक्रम राबविल्याबद्दल कार्यशाळेत सहभागी झालेल्या नागरिकांनी ऋताताई आव्हाड व संघर्ष संस्थेचे आभार मानले.

Post a Comment

0 Comments