भिवंडीत संघाला विजय मिळवून देणारा त्याचा षटकार ठरला काळ ; मॅच जिंकणार षटकार मारणाऱ्या खेळाडूचे हृदय विकाराच्या झटक्याने निधन


भिवंडी :दि.20 (प्रतिनिधी )  दोन चेंडूत 4 धावा आवश्यक असताना खेळपट्टी वर उभ्या असलेल्या खेळाडूने उत्तुंग षटकार ठोकून आपल्या संघाला विजय मिळवून दिला मात्र विजयाचा आनंद साजरा करीत असतानाच षटकार मारणाऱ्या क्रिकेटपट्टू वर काळाने झडप घातली. ज्यामध्ये संजय ठाकरे वय 45 रा.अंबाडी यांचा दुर्दैवी अंत झाला आहे.ही हृदयद्रावक घटना भिवंडी तालुक्यातील अंबाडी येथे घडली आहे.


          याबाबत मिळालेली माहिती अशी की,भिवंडी तालुक्यातील अंबाडी येथील माजी ग्रामपंचायत सदस्य संजय गोविंद ठाकरे हे उत्कृष्ट क्रिकेटपटू ही होते. रविवारी 45 वर्षां वरील खेळाडूं साठी 45 प्लस क्रिकेट स्पर्धेचे आयोजन तालुक्यातील घोटगाव येथे केले होते.
त्या ठिकाणी टुर्नामेंटमध्ये संजय ठाकरे हे गुड मॉर्निंग संघातर्फे खेळण्यासाठी गेले होते.ते खेळत असणाऱ्या गुड मॉर्निंग या संघाला जिंकण्यासाठी शेवटच्या षटकात शेवटच्या 2 चेंडू वर 4 धावांची गरज होती.


         त्यावेळी खेळपट्टी वर फलंदाजी करणाऱ्या संजय ठाकरे यांनी उत्तुंग षटकार ठोकून आपल्या संघाला विजय मिळवून दिला.विजयाचा आनंद साजरा करीत घरी निघालेल्या संजय ठाकरे यांच्या छातीत दुखू लागल्याने त्यांना तात्काळ अंबाडी येथील खाजगी रुग्णालयात उपचारा साठी त्यांचे सहकारी खेळाडू घेऊन गेले.दुर्दैव मात्र रुग्णालयात दाखल करण्या आधीच त्यांना मृत्यूने गाठले त्यामध्ये त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.


       भिवंडी तालुक्यातील अंबाडी या महत्वपूर्ण ग्रामपंचायतचे ते अनेक वर्षे सदस्य म्हणून कार्यरत होते. तर उत्कृष्ट क्रिकेटपटू असणारे संजय ठाकरे हे सामाजिक कार्यातही अग्रेसर होते. त्यांच्या अकाली निधनामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत असून परिसरावर शोककळा पसरली आहे.

Post a Comment

0 Comments