रस्तारुंदी करणातील १४ बाधित निवासी बांधकामावर महापालिकेची कारवाई

रस्तारुंदीकरणात बाधित बांधकामावर करण्यात आलेल्या कारवाईची छायाचित्रे.


ठाणे : ठाणे महानगरपालिकेच्यावतीने माजिवडा-मानपाडा प्रभाग समिती अंतर्गत प्रभाग क्र.१ येथील  मौजे कावेसर आनंदनगर ते वाघबीळ या ४० मी. रस्तारुंदीकरणात अडथळा ठरणाऱ्या १४ बाधित निवासी घरांवर निष्कासनाची कारवाई करण्यात आली. सदर निष्कासनाची कारवाई ठाणे महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांच्या आदेशांन्वये करण्यात आली आहे.


        या रस्तारुंदीकरण कारवाईतंर्गत माजिवडा-मानपाडा प्रभाग समिती अंतर्गत प्रभाग क्र.१ मौजे कावेसर आनंदनगर ते वाघबीळ येथील पृथ्वीराज गोंधळे यांची चार घरे, नामदेव गेणू सावंत यांचे एक घर, कमलाकर पांडुरंग शिंगे यांची दोन घरे, तर तुळशिराम राघो पाटील यांची सात घरे अशा एकूण १४ बाधीत निवासी घरांवर १० जून, २०२२ रोजी निष्कासनाची कारवाई करण्यात आली. तसेच नागलाबंदर येथे अनधिकृत दोन विटा सिमेंटच्या अनधिकृत बांधकामावर देखील कारवाई करण्यात आली.


        सदर निष्कासनाची कारवाई अतिक्रमण नियंत्रण व निष्कासन विभागाचे उप आयुक्त जी.जी.गोदेपुरे, उप आयुक्त (परिमंडळ- ३)  दिनेश तायडे, सहाय्यक आयुक्त (सनियंत्रण व समन्वय) महेश आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक आयुक्त प्रीतम पाटील यांनी अतिक्रमण विभागाचे कर्मचारी साहाय्याने यांच्या पोलीस बंदोबस्तात केली.    


Post a Comment

0 Comments