डोंबिवलीत जीवघेणी वाहतूक... वाहनाचालकांचा जीव धोक्यात मनसैनिकाने उठवला आवाज


डोंबिवली ( शंकर जाधव) डोंबिवलीत वाहतूक व्यवस्थेवर वाहतूक पोलिसांचे लक्ष नसल्याचे पुन्हा एकदा दिसून आले आहे.वाहतुकीचे नियम धाब्यावर बसवून सर्रासपणे वाहतूक केली जाते.रिक्षाचालकांना आजवर जबाबदार ठरविणारे इतर वाहने बेजबाबदार करताना आवाज उठवत नाही.


मात्र अरुण जांभळे या  मनसैनिकाने व्हिडीओ काढून डोंबिबलीत चक्क एका वाहनात कोणतीही सुरक्षा न बाळगता लोखंडी सळ्यांची  वाहतूक केल्याचे दाखवून दिले.सोमवारी डोंबिवली पूर्वेकडील मानपाडा रोडवरून टंडन रोडला जाणाऱ्या मार्गावरून ही धोकादायक वाहतूक सूरु होती.


सुरक्षा नसताना अश्या प्रकारे धोकादायक वाहतूक केली जात असताना इतर  वाहनचालकांचा जोव धोक्यात असतो.वाहतूक पोलिसांनी याकडे गांभीर्याने लक्ष न दिल्यास अश्या धोकादायक वाहतुकीने वाहनचालकांचा जीव जाण्याची शक्यता आहे.यावर लवकरच मनसे वाहतूक सेना आवाज उठवणार असल्याचे जांभळे यांनी सांगितले.

Post a Comment

0 Comments