डोंबिवली तील १ लाख १७ हजार मतदार मतदाना पासून राहणार वंचित

 


डोंबिवली  ( शंकर जाधव ) आधीच डोंबिवली विधानसभा मतदार संघात 40 टक्क्यांपेक्षा कमी मतदान होते.त्यात निवडणूक आयोगाच्या एका अटीने मतदानाचा टक्का आणखीनच कमी होण्याची शक्यता आहे.मतदार यादीत फोटो नसल्यास मतदान करता येणार नसल्याने डोंबिवलीतील १ लाख १७ हजार मतदारांचे नाव मतदान यादीतून वगळल्यात आली आहे.भाजप जिल्हा अध्यक्ष शशिकांत कांबळे यांनी निवडणूक आयोगाच्या अटीवर नाराजी व्यक्त करत हि अट रद्द करावी अशी मागणी केली आहे. 
    

मंगळवारी भाजपा कल्याण जिल्हाध्यक्ष शशिकांत कांबळे यांनी पूर्वेकडील भावे सभागृहातील निवडणूक कार्यालयाला भेट दिली. कडोंमपाच्या निवडणुकीसाठी मतदार याद्यांची कामे सुरू आहेत. दरम्यान यावेळी निवडणुक मतदार नोंदणी अधिकारी ठाकुर यांच्याशी मतदार यादींबाबत सविस्तर चर्चा झाली.


यावेळी निदर्शानस आले की २०२१ ते  ३१ मे २०२२   पर्यंत डोंबिवली १४३ मतदार संघातील फोटो नसलेली जवळपास १ लाख १७ हजार नाव वगळण्यात आली आहेत. त्यामुळे यादीत काही कारणाने फोटो नसले तरी त्यांना मतदानापासून वंचित ठवू नका. यादीत ज्यांचे फोटो नाहीत अश्या मतदारांनां मतदान करण्यास परवानगी द्यावी.  मतदारांना लोकशाहीने, घटनेने जो त्यांचा पवित्र अधिकार दिला आहे तो हिरावून घेऊ नये असे सांगण्यात आले.


महानगरपालिका व इतर निवडणुकांवेळी असलेल्या ज्या मतदार याद्या आहेत त्या ग्राह्य धाराव्या. तसेच ज्यांचे मतदार यादीत फोटो नाहीत त्यांच्या घरोघरी बिएलओ पाठवुन ज्यांचे फोटो नाही त्यांचे फोटो घ्यावे अशी सूचनाही अधिकाऱ्यांना करण्यात आली. यावेळी भाजपा कल्याण जिल्हा युवा मोर्चा सरचिटणीस पवन पाटील, डोंबिवली पश्चिम युवा मोर्चा शहर अध्यक्ष कृष्णा पाटील, मंडल उपाध्यक्ष अमोल दामले, सुरेश जोशी, मंडल‌ सचिव मनिष शिंदे, प्रशांत पाटेकर,‌ चिंतन देढीया, सुरेन्द्र दुबे, कदम, गणेश निंबाळकर, नेमाडे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments